• Mon. Apr 20th, 2026

भक्ती आणि शक्तीचा विचाराचा मेळावा…

Bybaba maske

Oct 3, 2022

भक्ती आणि शक्तीचा विचाराचा मेळावा…

 

 मुंडे साहेबांच्या आठवणी जागृत करण्यासाठी पंकजाताई मुंडे यांच्या हाकेला प्रतिसाद देऊन सावरगाव दसरा मेळाव्याला समाज बांधवांनी उपस्थित रहावे- असे आव्हान-विष्णू(भाऊ)घुले यांनी केले.

 

केज/प्रतिनिधी

 

लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या आठवणींना जागृत करण्यासाठी पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली येत्या 5 ऑक्टोबर रोजी सावरगाव जिल्हा बीड येथे होणार्‍या दसरा मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित रहा असे आव्हान विष्णू (भाऊ)घुले यांनी केले आहे.

  ऊसतोड कामगार कष्टकरी शेतकरी यांना न्याय देण्यासाठी,अठरापगड जाती मध्ये स्वाभिमान जागृत करण्याच्या दृष्टीने लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांनी भगवान बाबा यांनी सुरू केलेली दसरा मिळाव्याची परंपरा कायम राखली होती.सन 2014 मुंडे साहेबांच्या अकाली निधना नंतर त्यांच्या कन्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी ही परंपरा पुढे कायम ठेवली.मध्यंतरी भगवानगडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री महाराज यांनी भगवानगडावर कुठलेही राजकीय व सामाजिक मिळावे होणार नाही अशी भूमिका घेतली.

मात्र दसरा मेळावा ही स्वाभिमानी परंपरा खंडित होता कामा नये म्हणून समाजा च्या आग्रहास्तव दसरा मेळावा ही परंपरा कायम ठेवू अशी भूमिका पंकजाताई मुंडे यांनी घेतली यासाठी नामदेव शास्त्री महाराज यांच्या निर्णयाचा सन्मान राखून पंकजाताई मुंडे यांनी भगवान बाबा यांचे जन्मगाव सावरगाव (जिल्हा बीड) येथे दसरा मेळावा घेण्याचा निर्णय घेतला.

मुंडे साहेबांच्या आठवणी जागृत करण्यासाठी लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या हाकेला प्रतिसाद देऊन सावरगाव दसरा मेळाव्याला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विष्णू(भाऊ)घुले यांनी केले.

              🔸प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी चिंचोली जिल्हा परिषद गटातून व केज तालुक्यातून हजारो भगवान बाबा भक्त सावरगाव घाट येथे मेळाव्यासाठी जाणार आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!