*जिल्हा परिषद बीड कार्यालयासमोर प्रेरक/प्रेरीका यांचे विविध मागण्यासाठी अमरण उपोषण*
बीड (प्रतिनिधी) दि. ३ रोजी जिल्हा परिषद बीड कार्यालयासमोर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रेरक/प्रेरिकाव समन्वयक यांचे विविध मागण्यासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. या मध्ये सन २०१२पासुन हा साक्षर भारत अभियान कार्यक्रामा अंतर्गत जिल्ह्यातील १४०० प्रेरक काम करतात हा कार्यक्रम २०१८ ला संपला. परंतु ह्या प्रेरकांचे मानधन मात्र मिळाले नाही या साठी आज पासून आमरण उपोषणाला बसले आहेत. प्रेरक प्रेरीका यांचे तात्काळ मानधन देण्यात आले पाहिजे.नवसाक्षर योजनेत प्रेरक प्रेरीका व समन्वयक यांना नियुक्ती देण्यात यावी. सन २०१५-१६ यांचे कुटुंब सर्वेक्षण केलेले मानधन देण्यात यावे अशा विविध मागण्यासाठी मोठ्या संख्येने जिल्हा परिषद बीड समोर आमरण उपोषण चालू आहे.या मध्ये प्रेरक प्रेरीका यांचे जिल्हा अध्यक्ष गणेश काळे, पठाण फिरोज,चोपडे बाबा, कैलास वाव्हळकर, क्षीरसागर गौतम,सय्यद रज्जाक,किसन सवासे, रंजीत घाडगे,सचिन बचुटे,डोंगरे अविनाश,आवाड राहुल,मुजमूले बंडु,व जिल्ह्यातील मोठ्या संख्येने प्रेरक प्रेरीका उपस्थित होते..