• Mon. Apr 20th, 2026

*बोंबला ! न्यायालयाच्या परिसरातून चक्क वकीलाचीच मोटार सायकल पळविली !*

Bybaba maske

Oct 7, 2022

*बोंबला ! न्यायालयाच्या परिसरातून चक्क वकीलाचीच मोटार सायकल पळविली !*

 

गौतम बचुटे/केज :- जिल्ह्यात मोटार सायकल आणि वाहन चोरीच्या घटना वाढल्या असून चोर एवढे निर्ढावले आहेत की, सार्वजनिक ठिकाणाहून वाहन चोरीच्या घटना पूर्वी घडत होत्या परंतु आता चक्क न्यायदेवतेच्या परिसरातूनही वाहन चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत.
केज न्यायायलताच्या परिसरात पार्क केलेली एका वकिलाची मोटार सायकल चोरीला गेली आहे. केज येथील न्यायालयात वकिली करणारे ॲड. चंद्रकात बचुटे यांनी गुरुवार दि.६ ऑक्टोबर रोजी त्यांची होंडा शाईन ही मोटार सायकल क्र. (एम एच-२३/ए क्यू-०८६०) ही केज न्यायायलयाच्या परिसरात उभी केली होती. दुपारी मध्यंतरा नंतर ते त्यांचे न्यायालयीन काम आटोपल्या नंतर ते घरी जाण्यासाठी निघाले असता मोटार सायकल उभी केली तेथे जाऊन पाहिले तेथे त्यांची मोटार सायकल आढळून आली नाही. त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला; मात्र मोटार सायकल सापडली नाही. म्हणून त्यांनी दि. ६ ऑक्टोबर रोजी केज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्या नुसार केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४४९/२०२३ भा. दं. वि. ३७९ नुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकांत चौधरी हे पुढील तपास करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!