• Sun. Apr 19th, 2026

बुलेटस्वाराची रॉंग साईडने येऊन हिरो होन्डा शाईन मोटारसायकलला जोराची धडक देऊन पलायन

Bybaba maske

Oct 7, 2022

बुलेटस्वाराची रॉंग साईडने येऊन हिरो होन्डा शाईन मोटारसायकलला जोराची धडक देऊन पलायन

 

केज बीड रोड वरील बजरंग नगर येथे घडला अपघात 

 

रोखठोक वार्ताहर- केज

 

 केज – बीड रोडवर बजरंगनगरच्या समोर शेतीच्या कामावरून मोटर सायकलवरून घरी येत असताना मुखीमोदीन हमीदोद्दीन खतीब व मुजफोरोद्दीन हमीदोद्दीन खतीब मोंक्र.MH44-M6063 होन्डा सिबी शाईन गाडीचा अपघात झाला.
सविस्तर वृत्त असे कि केज शहरामध्ये वास्तव्यास असलेले मुखीमोदीन हमीदोद्दीन खतीब मुजफोरोद्दीन हमीदोद्दीन खतीब हे दोघे  भाऊ आपल्या शेतीतील कामे आटपुन आपल्या मोटारसायकल MH44-M6063 (होन्डा शाईन)  मोटार सायकलवरून घराकडे परतत असताना केज – बीड येथील बजरंग वस्तीच्या समोर आपल्या दिशाने जात असताना समोरून राँग साईडने येणारी मो.क्र.MH14-DQ7776 लाल रंगाची बुलेट या कपंनीच्या मोटार सायकलस्वाराने चालत्या गाडीला जोराची धडक देऊन त्या ठिकाणाहुन पलायन केले आहे . याआपघातामध्ये मुजफोरोद्दीन हमीदोद्दीन खतीब हे जखमी झाले असुन केज पोलीस ठाण्यामध्ये बुलेटस्वारा विरूद्ध गु.र.नं.450/2022 कलम 279,337,338 भादवि सह कलम 177/134 मोवाका प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सपोनि शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. सोनवणे हे करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!