जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले साधु तोची ओळखावा देव तेथेची जाणावा या तुकाराम महाराज यांच्या अभंगाला आपल्या कृतीतुन अंगीकारुन आयुष्यभर दिनदुबळ्यांना आर्थीक आधार देऊन अनेकांच्या जीवनात क्रांती घडविणारे कै.इंजी. अर्जुनराव लक्ष्मण राव जाहेर पाटील यांच्या द्वितीय जयंतीच्या स्मृती प्रित्यर्थ अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण दिनांक ०८-१०-२०२२ रोजी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या शुभहस्ते होत आहे.त्यानिमीत्ताने त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याचा हा लहानसा लेख . संकल्पना – चंद्रकांत पाटील ,केज .
कै.इंजी.अर्जुनराव जाहेर पाटील उर्फ अप्पासाहेब यांचा जन्म ईटकुर ता.गेवराई जि.बीड येथे सर्वसामान्य कुटुंबात झाला.प्राथमिक शिक्षण हिरापुर,मुंगी ता.शेवगाव जि.अहमदनगर तसेच सरस्वती भुवन औरंगाबाद आत्ताचे छञपती संभाजी महाराज नगर येथे झाले .तसेच मॕकेनीकल इंजीनिअरींगचे शिक्षण तेथेच झाले .इंजीनियरींगचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर बीड येथे वर्कशाॕप टाकले .व्यवसाय वाढीसाठी कर्जाची गरज होती म्हणून अनेक बॕकाचे उंबरे झिजवीले परंतु कर्ज मिळेना म्हणून बँक काढण्याचा निर्णय घेतला .छञपती राजर्षी शाहु महाराज यांच्या नावाने बँक काढुन बँकेच्या माध्यमातून अनेक कुटुंब उभे केले .सामाजिक ,आर्थिक,राजकीय ,शेक्षणीक क्षेत्रातही आपले योगदान देऊन आपल्या कतृत्वाचा ठसा उमटविला. भव्य शरीरयष्टी असलेले व्यक्तीमत्व पहाताच आपल्या परिवारातीलच एक व्यक्ती आहे या भावनेने प्रत्येकाला आपलेसे करण्याचा त्यांचा स्वभाव होता .तरुणालाही लाजवेल असा उत्साह असलेले आमचे अप्पासाहेब समाजातील एक दिपस्तंभ होते.आजारीपणामुळे वयाच्या पंचाहत्तर वर्षानंतर त्यांनी देह ठेवला.आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठीच खर्च केला .त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण नॕचरल शुगरचे संस्थापक अध्यक्ष श्री.बी.बी.ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असुन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या शुभहस्ते होत आहे.या अनावरण प्रसंगी शिवमती रेखाताई खेडेकर,आमदार चिखली,ह.भ.प.शिवाजी महाराज गुरु महादेव महाराज महंत श्री क्षेत्र नारायणगड,सत्यनारायणजी लोहीया अध्यक्ष ,मराठवाडा अर्बन बँक्स को-आॕप असोसिएशन लि.औरंगाबाद , श्री.मानसिंग पवार मा.अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर आॕफ काॕमर्स इंडस्ट्रीज अँण्ड अॕग्रीकल्चर,श्री.सुनील ओमप्रकाश देवडा अध्यक्ष ओमप्रकाश देवडा पिपल्स को-आॕप बँक लि.हिंगोली तथा संचालक दि महाराष्ट्र अर्बन को आॕप.बँक्स फेडरेशन लि.मुंबई ,श्री.अजय जव्हेरीलाल ब्रम्हेचा ,अध्यक्ष दि लासलगांव मर्चंट को- आॕप बँक लि लासलगांव तथा संचालक दि महाराष्ट्र अर्बन को -आॕप बँक्स फेडरेशन लि.मुंबई हे उपस्थीत रहाणार आहेत .तरी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थीत रहावे असे आवाहन इंजी.श्री .अजय अर्जुनराव पाटील , प्रा.श्री.नारायण नरहरराव मस्के उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ व कर्मचारी श्री छञपती राजर्षी शाहु अर्बन को- आप बँक लि बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.हा कार्यक्रम माँ.वैष्णवी पॕलेस ,एम आय डी सी रोड,बीड येथे हा कार्यक्रम सकाळी १०-३० वाजता होणार आहे.दिनांक ०८-१०-२०२२ रोजी अर्ध पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम बँकेची मुख्य शाखा जनाधार भवन,जालना रोड ,बीड येथे मान्यवरांच्या हस्ते होणार असुन याचे थेट प्रक्षेपण माँ.वैष्णवी देवी पॕलेस येथे दाखविण्यात येणार आहे. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थीत रहावे असे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.