गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यात शेतातील मंदिरावर वीज पडून शेतात काम करीत असलेले पती-पत्नी हे दोघे जखमी झाले आहेत.
केज तालुक्यातील कोरेगाव येथे रविवार दि. ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:३० वा बळीराम गोवर्धन तांदळे वय ३५ वर्ष आणि त्यांची पत्नी सौ. अनिता बळीराम तांदळे हे त्यांच्या शेतात शेरी नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतात सोयाबीनची काढणी करीत असताना अचानक विजेच्या गडगडटासह पाऊस सुरू झाला. म्हणून त्यांनी तेथे असलेल्या रानुबा मंदिरात निवाऱ्याला बसले असता त्या रानोबाच्या मंदिरावर वीज पडली. त्यात बळीराम गोवर्धन तांदळे वय ३५ वर्ष आणि त्यांची पत्नी सौ. अनिता बळीराम तांदळे हे दोघे जखमी झाले असून त्यांना बेशुद्धावस्थेत उपजिल्हा रुगणलय केज येथे हलविले आहे.
दरम्यान या नैसर्गिक अपघाताची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, नायब तहसीलदार लक्ष्मण धस आणि बीट जमादार दिलीप गित्ते यांना दिली असून ते घटनास्थळी रवाना होत असल्याची माहिती मिळते.