• Sat. Aug 8th, 2026

अंबाजोगाई विभागातील विद्युत कर्मचाऱ्यांचे आज पासून बेमुदत धरणे आंदोलन

Bybaba maske

Oct 10, 2022

अंबाजोगाई विभागातील विद्युत कर्मचाऱ्यांचे आज पासून बेमुदत धरणे आंदोलन

पाचशे विद्युत कर्मचारी होणार आंदोलनात सहभागी

 

केज प्रतिनीधी

विद्युत देयकाच्या वसुलीची सर्वस्वी जबादारी १४६४ च्या परिपत्रका नुसार हि शाखा अभियंता,उपकार्यकारी अभियंता ,कार्यकारी अभियंता अंबाजोगाई यांची असतानाही त्यांनी वसुली न केल्याने अंबाजोगाई विभागातील विद्युत थकबाकी कोटयावधी रुपयांच्या घरात गेलेली आहे असे असतांनाही विद्युत देयकाच्या वसुलीसाठी विद्युत तांत्रिक कर्मचाऱ्याचा वापर करून वसुली न झाल्याच्या ठपका ठेवत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात असल्याने या अन्याय विरुद्ध वीज कामगार संयुक्त कृती समितीने आवाज उठवत बेकायदेशीरपणे विद्युत कर्मचाऱ्यावर केलेली दंडात्मक कार्यवाही रद्द करण्यात यावी या मागणीसाठी सोमवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी अंबाजोगाई विभागीय कार्यालयासमोर पाचशेच्या वर विद्युत कर्मचारी बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत
करोनाच्या काळात करण्यात आलेल्या लॉक डाऊनचा परिणाम विद्युत वितरण कंपनीच्या विद्युत वसुलीवर झाल्याने मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढली असल्याने विद्युत ग्राहकाकडील थकबाकी वसुली करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीचे औरंगाबाद विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ मंगेश गोंदावले यांनी दिनांक १ सप्टेंबर २००१ मध्ये १४६४ क्रमांकाचे परिपत्रक काढत वीज बिलाची २५ हजार रुपया पर्यंतची वसुली हि शाखा अभियंता ,२५ हजार एक रुपया ते ५० हजार रुपया पर्यंत उपकार्यकारी अभियंता ,५० हजार १ रुपया ते एक लाख रुपया पर्यंतची विद्युत थकबाकी हे कार्यकारी अभियंता यांनी करावी व १ लाख १ रुपये ते पाच लाख रुपया पर्यंत अधीक्षक अभियंता ,व पाच लाख रुपया पेक्षा जास्तीची थकबाकी हि मुख्य अभियंत्यांनी करण्याची जबादारी परिपत्रकाद्वारे देण्यात आलेली असतानाही शाखा अभियंता, उपकार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता यांनी विद्युत देयकाची थकबाकीची वसुली न केल्याने ऑगस्ट २०२१ पासून अंबाजोगाई विभागाची विज बीलाची थकबाकी कोटयावधी रुपयाच्या वर गेली आहे यास हे अधिकारी जबादार असताना त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे सोडून विद्युत बिलाची वसुली न केल्याचा ठपका ठेवत विद्युत कर्मचाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करत त्यांना सातत्याने कारणे दाखवा नोटीस देऊन कामगारांत दहशहत व दबाव तंत्राचा वापर करण्याचे काम केले जात असल्याने कर्मचाऱ्यांवर करण्यात येत असलेल्या अन्यायाविरुद्ध कामगार महासंघ, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना ,वीज तांत्रिक कामगार युनियन ,वर्कर्स फेडरेशन ,विद्युत क्षेत्र तांत्रिक युनियन ,स्वाभिमाननी वर्कर्स युनियन, क्रांतिकारी लाईनस्टाफ़ सेना, महाराष्ट्र राज्य विद्युत ऑपरेटर संघटना अंबाजोगाई विभागातील या नऊ विद्युत कर्मचारी संघटनांनी वीज कर्मचाऱ्यावर होत असलेल्या अन्याया विरुद्ध एकत्र येत वीज कामगार संयुक्त कृती समितीची स्थापना करत दिनांक २३ सप्टेंबर रोजी कार्यकारी अभियंता यांना जनमित्रावर करण्यात आलेली दंडात्मक कार्यवाही रद्द करण्यात यावी ,वीज बिलाच्या वसुलीसाठी १४६४ परिपत्रकाची अमलबजावणी करण्यात यावी, चुकीची मीटर रिडींग घेणाऱ्या एजन्सीवर कार्यवाही करण्याची मागणी केली मात्र याकडे विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने अंबाजोगाई विभागातील पाचशेच्या वर विदुत कर्मचारी ,कार्यकारी अभियंता अंबाजोगाईयांच्यासह अंबाजोगाई विभागातील उपकार्यकारी अभियंता व शाखा अभियंता यांना १४६४ परिपत्रकानुसार निलंबित करण्याच्या मागणीसाठी सोमवार पासून विभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!