• Sun. Apr 19th, 2026

भगीरथ बियाणी आत्महत्या प्रकरणात नविन माहिती समोर!

Bybaba maske

Oct 13, 2022

भगीरथ बियाणी आत्महत्या प्रकरणात नविन माहिती समोर!

बीड, प्रतिनिधी…

भाजपचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले.भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडली. परंतु, आता या प्रकरणात एक नवी माहिती समोर आली आहे. भगीरथ बियाणी पिस्तूल साफ करत असताना चुकून गोळी झाडली गेली असल्याचा अंदाज त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. 

           पोलिसांनी बियाणी यांचा मोबाईल न्यायवैद्यक चाचणीसाठी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला आहे. बीड शहरातील विप्र नगर भागांत राहणारे भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी त्यांच्या राहत्या घरी बाथरूममध्ये डोक्यात स्वतःकडील पिस्तुलनं गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती.

भगीरथ बियाणी यांचे बंधू बाळकृष्ण बियाणी यांनी पेठ बीड ठाण्यात दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. या आत्महत्येनंतर बीडमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात होत्या. पोलिसांनी सुद्धा आत्महत्या संदर्भात तपास सुरू केला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!