• Fri. Sep 11th, 2026

*शहरात बडया व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा*

Bybaba maske

Oct 13, 2022

*शहरात बडया व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा*

 सव्वा कोटी रूपये रोख,सव्वाकिलो सोने लुटले 

रोखठोक वार्ताहर

लातूर : लातूर येथील प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या कन्हैयानगर परिसरातील घरात बुधवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास दरोडा पडला. या दरोड्यात तब्बल सव्वादोन कोटी रुपये रोख व सव्वाकिलोपेक्षा जास्त सोने लुटून नेण्यात आले आहे.
लातूर शहरातील प्रसिद्ध व्यापारी राजकमल अग्रवाल यांचे गंजगोलाई परिसरात गोयल ट्रेडिंग कंपनी नावाचे मोठे दुकान आहे. याशिवाय त्यांचा प्लॉटिंगचा व्यवसायही आहे. शहरातील कातपूर रोडवरील कन्हैयानगर परिसरात ते राहतात. बुधवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास चोरट्याने त्यांच्या घरामध्ये प्रवेश केला व त्यानंतर चाकू व पिस्तुलसदृश वस्तूचा धाक दाखवून त्यांच्याकडून कपाटाच्या व लॉकरच्या चाव्या घेतल्या. त्यांचे मोबाईल ताब्यात घेतले व घरातील सुमारे सव्वादोन कोटी रुपयांची रोकड व सव्वाकिलो सोने लुटले.यानंतर दरोडेखोरांनी दरोडेखोरांनी ‘आम्ही आसपासच आहोत, सकाळी सहा वाजेपर्यंत कोणाशीही संपर्क साधू नका,’ अशी धमकी दिली व ते पसार झाले.
२५ ते ३० वर्षे वयाचे पाच दरोडेखोरांनी ही लूट केली. ते सारे मराठीत बोलत होते, अशी माहिती तक्रारदार राजकमल अग्रवाल यांनी सकाळी विवेकानंद पोलीस ठाण्यात नोंदवली.
पोलीसअधिकाऱ्यांनी श्वानपथकासह घराला भेट दिली गुन्हा नोंदवल्यानंतर पोली दरोडेखोरांचा शोध घेत आहेत दरम्यान एवढी मोठी रक्कम घरा कशी ठेवली होती, या विषयी आश्चर्य व्यक्त होत आहे.
यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्यासह सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी श्वानपथकासह भेट दिली गुन्हा नोंदवल्यानंतर पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.दरम्यान एवढी मोठी रक्कम घरात कशी ठेवली होती या विषयीही आश्चर्य व्यक्त होत आहे.

baba maske

Related Post

धाराशिव ब्रेकिंग : मराठा आंदोलकांनी जाळली उमरगा तहसीलदारांची खुर्ची!मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप; आंदोलन पोलिसांच्या ताब्यात, घटनेने एकच खळबळ
केज पोलिसांची मोठी कारवाई! १४.८८ लाखांचा ७४.४३२ किलो गांजा जप्त; आरोपी जेरबंदकेवड गायरान परिसरात छापा; सुनील शिवाजी पवार याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा
खरा मालक अंधारात ठेवून बनावट मालक व बोगस कागदात्राद्वारे प्लॉटचे खरेदी खत केले ; तिघा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!