• Thu. Oct 22nd, 2026

विड्यात कल्याण मटका जुगारावर पोलिसांचा छापा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल! एकाला रंगेहात पकडले; मोबाईलसह १५ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Bybaba maske

Oct 10, 2026

विड्यात कल्याण मटका जुगारावर पोलिसांचा छापा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!

एकाला रंगेहात पकडले; मोबाईलसह १५ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

रोखठोक न्यूज | प्रतिनिधी, केज

केज : तालुक्यातील विडा येथे सुरू असलेल्या चालता-फिरता कल्याण मटका जुगारावर केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या पथकाने छापा टाकत एका संशयिताला रंगेहात पकडले. या कारवाईत मटका जुगाराचे साहित्य, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण १५ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विडा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सार्वजनिक ठिकाणी पैशांचा डाव लावून कल्याण मटका जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांच्या आदेशानुसार जमादार अनिल मंदे आणि जमादार राजू गुंजाळ यांच्या पथकाने ७ ऑक्टोबर रोजी छापा टाकला.

या कारवाईदरम्यान स्वप्नील कैलास वाघमारे (रा. विडा) याला मटका जुगार घेताना पकडण्यात आले. पोलिसांची चाहूल लागताच मटका खेळणाऱ्या इतरांनी घटनास्थळावरून पळ काढला.

पोलिसांनी चौकशी केली असता, मटक्याचे आकडे केज येथील गणेश खराडे याला १० टक्के कमिशनवर देत असल्याचे स्वप्नील वाघमारे याने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यानंतर पोलिसांनी मटका जुगाराचे साहित्य, १ हजार ७६० रुपये रोख आणि मोबाईल असा एकूण १५ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी जमादार अनिल मंदे यांच्या फिर्यादीवरून स्वप्नील वाघमारे आणि गणेश खराडे या दोघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जमादार उमेश आघाव करीत आहेत.

रोखठोक न्यूज, जनसामान्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज!

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!