भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन.मोठ्या संख्येने रक्तदान करा.
अल-जमीअतुल कुरेश,केज च्या वतिने आव्हान.
रोखठोक वार्ताहर
रक्तदान श्रेष्ठ दान या उक्तीनुसार केज शहरात अल-जमीअतुल कुरेश यांच्या वतिने भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले आहे,केज उपजिल्हा रूगणालय व स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई या ठिकाणी रक्ताची खूप तुटवडा जाणवत असल्या, कारणाने दोन्ही रुग्णालयाने आव्हान केल्या नंतर अल-जमीअतुल कुरेश यांच्या वतीने प्रतिसाद दिला व भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केज शहरात केले असुन सगळ्यानी रक्तदान करून सहकार्य करावे. तुमच्या मुळे एखाद्याचा प्राण वाचु शकतो.त्या साठी रक्तदान करा.दि.15/10/22 शनिवारी, सकाळी 10 वाजता.कुरेशी शादीखाना,दर्गा रोड कुरेशी मोहल्ला या ठिकाणी आयोजित केले आहे तरी सर्वानी रक्तदान करून सहकार्य करावे, अशी विनंती अल-जमीअतुल कुरेश यांच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.