• Fri. Jun 5th, 2026

*वीज वितरण कर्मचाऱ्यांनो सलाम तुम्हाला…..!*  

Bybaba maske

Oct 14, 2022

वीज वितरण कर्मचाऱ्यांनो सलाम तुम्हाला…..!

 

संततधार पावसात भिजत रोहित्र दुरुस्तीचे काम !

—————————————————–

गौतम बचुटे/केज :- केज शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी संततधार पावसात भिजत रोहित्र बदलायचे काम सुरू ठेवले.
केज येथील विज वितरण केंद्रातील १० मेगा व्होल्टेजचे मुख्य रोहित्र बदली करण्यात येत आहे मात्र केज आणि परिसरात आज दिवसभर संततधार पाऊस सुरु असताना देखील वीज कर्मचाऱ्यांनी त्याची पर्वा न करता पडत्या पावसात संपूर्ण भिजत रोहित्र बदलण्याचे काम सुरूच ठेवले या बद्दल सर्व वीज वितरणचे कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या धाडसाला सलाम. शहरातील नागरिक अंधारात राहू नयेत म्हणून स्वतःच्या जिवाची आणि पृकृतीची काळजी न करता कर्तव्य श्रेष्ठ समजून दिवसभर काम सुरू आहे. यात स्वतः चाचणी विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यादव, सहाय्यक अभियंता तलांडे साहेब, केज उपविभागाचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता सुतार साहेब, केज शहराचे कनिष्ठ अभियंता अंडील साहेब, लाईनमन व कर्मचारी सहभागी झालेले आहेत

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!