*लोंबळणाऱ्या तारामुळे अनर्थ होण्याची नागरिकांत भीती*
गौतम बचुटे/केज :- केज शहरातील समता नगर मध्ये नागरी वस्तीवरून ३३ के व्ही उच्च दाबाच्या वीज वाहक तारा गेलेल्या असून त्या या पूर्वी दोन वेळा तुटल्या असल्याने नागरिकात भीती निर्माण झाली आहे.
केज शहरात शासकीय विश्रामगृहा पासून फुलेनगर ते वसुंधरा शाळे पर्यंत आणि समता नगर मधील घरा वरून ३३, के व्ही या उच्च दाबाच्या मुख्य वीज वाहक तारा गेलेल्या आहेत. या वीज वाहक तारेच्या खाली अनेक घरांचे बांधकाम झालेले आहे आणि तेथे लोक राहतात. या परिसरात अनेक वेळा तार तुटून या घरावर पडलेल्याच्या घटना घडल्या आहेत. मागील आठवड्यात वसुंधरा शाळे जवळ दोन वेळा तार तुटून पडली होती मात्र त्या वेळी वीज ट्रिप होऊन वीज पुरवठा बंद झाल्यामुळे सुदैवाने जीवित हानी झाली नाही. दरम्यान नागरी वस्तीतील ही वीज वाहक लाईन काढून ही लाईनमहार्गाच्या समांतर असावी म्हणून या भागातील नागरीक दहा वर्षा पासून वीज वितरण कंपनीकडे मागणी करीत आहेत.
मात्र अद्याप कारवाई झालेली नाही. या तारामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यानी याची तात्काळ दखल घेऊन या वीज वाहक तारा इतरत्र स्थलांतरित करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.