*येडेश्वरी शुगरचा २५ रु तनाप्रमाणे तिसरा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा*
गौतम बचुटे/केज :- शेतकऱ्यांच्या उसाला सर्वात जास्त भाव देणारा कारखाना म्हणून ख्याती असलेल्या शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे यांच्या येडेश्वरी शुगरचे २५ रु. प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा करून ऊस उतपादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे.
शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे यांच्या आनंदगाव (सारणी) ता. केज येथील येडेश्वरी साखर कारखाना युनिट क्र.१ ने सन २०२१-२२ मध्ये गाळप केलेल्या उसाला पहिला हप्ता २१०० रु. प्रमाणे, दुसरा हप्ता ४०० रु. प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्वीच जमा केला आहे. आता दिवाळीच्या सणाचे औचित्य साधून शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून येडेश्वरीने तिसरा हप्ता २५ रु. प्रति टना प्रमाणे दि. १४ ॲाक्टोबर २०२२ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे.
आत्ता पर्यंत बीड जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकविलेल्या उसाला सर्वाधिक म्हणजे २ हजार ५२५ रु. प्रति टन भाव येडेश्वरी शुगरने दिला आहे.
—————————————–
या वर्षीच्या गळीत हंगामात बजरंग सोनवणे यांनी सर्व ऊस उत्पादक शेतकरी, वाहन मालक, कारखाना कर्मचारी, ऊसतोड मुकदम, कामगार व वरुणराजाच्या आशिर्वादाने पुढील हंगामात देखील उच्चांकी भाव देण्याचे उद्धिष्ट आहे. ते पूर्ण करणारच असा संकल्प केला आहे.