• Tue. Jul 28th, 2026

जनविकास आघाडीच्या प्रमुख ते नगराध्यक्षाच्या निवासस्थाना कडे जाणार्‍या रस्त्याचेच हाल बे हाल.

Bybaba maske

Oct 15, 2022

जनविकास आघाडीच्या प्रमुख ते नगराध्यक्षाच्या निवासस्थाना कडे जाणार्‍या रस्त्याचेच हाल बे हाल.

 

केज नगरपंचायत होऊन आज 10/11 महिन्याचा कालावधी संपत येत आहे,केजला स्वित्झर्लंड करण्याच आश्वासन देणारे जनविकास परिवर्तन आघाडीचे नेते व त्या पक्षाच्या नगराध्यक्षा यांच्या घरा कडे जाणारा रस्ता कमालीचा खराब झाला आह.तहसील कार्यालय च्या पाठी मागून जाणारा हा रस्ता जनविकास चे सर्वेसरवा यांच्या घरा पासुन त्यांच्या सुविद्य पत्नी नगरसेवक असलेल्या वार्ड क्रमांक 8 मधून नगराध्यक्षाच्या वार्ड क्रमांक 7 मधून व वार्ड क्रमांक 9 मधून जाणारा 33 फुटाचा रहदारी असलेला रस्ता आहे पण या रस्त्याची अवस्था बघवली जात नाही.जनविकास चे सर्वेसर्वा व नगराध्यक्षाच्या वार्डाचे हे हाल असतील तर बाकीचा विचार सुद्धा करवत नाही असा जनमानसात शंका व्यक्त केली जात आहे.हा रोड तात्काळ दुरुस्त करावा अशी वार्ड क्रमांक 7/8/9 च्या जनतेतून मागणी होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!