शहरात ३०० दिवसापुर्वी जनविकास परिवर्तन आघाडी व कॉग्रेस च्या सहाय्याने जनविकास आघाडीचा नगर अध्यक्ष पदी सौ सिता बनसोड यांची निवड झाली . परंतु विकास कामे होत नाहीत , नगरसेवकाना विश्वासात घेत नसल्याचे सांगत सत्ताधारी नगरसेविका इनामदार तरमिमबेगम गजमफर प्रभाग अकरा ( ११ ) च्या नगरसेविकेनेच मुख्याधिकारीना निवेदन दिले आहे याची चर्चा शहरात जोरात चालू असून अवघ्या ३०० दिवसातच आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा सुरू आहे .
प्रभाग अकरा ( ११ ) मधील नागरिकांना सुविधा देता येत नसल्याने नगारसेविकाला मनापासून वाईट वाटत होते . वारंवार रस्ता मजबुती करण , नाल्या दुरुस्ती , बोअरवेल दुरूस्ती , पथदिवे , अस्वस्थता , डासाचा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार सुचना देऊन सुध्दा कामे होत नाहीत तसेच घनकचरा साठी ची निविदा निघाली होती ती एका एजन्सीला निघाली असताना देखील ती अडवून ठेवल्याची चर्चा असून जर निविदा मंजूर असतानाही ती कोणताही ठराव न घेता रद्द का केली याची माहिती नगरसेवकाना का दिली नाही कोणत्याही नगरसेवकाना विश्वासात न घेताच निविदा रद्द का केली याची माहिती देण्यात यावी व घनकचरा स्वतंत्र विभाग असताना त्यावर जनरल विभागातून खर्च केल्याचे सांगितले जाते मग असा मनमानी कारभार जर नगर अध्यक्ष करत असेल तर बाकीच्यानी काय काम करायचे . सत्ताधारी नगरसेविका इनामदार तरमिमबेगम गजमफर यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन माहिती मागितल्यामुळे अवघ्या तिनशे ( ३०० ) दिवसातच आघाडीत बिघाडी झाली असल्याची चर्चा शहरात सुरू असून राज्यात जशी सत्ता परिवर्तन झाले तसेच शहरात ही लवकरच सत्ता परिवर्तन होणार का अशी चर्चा आहे.