• Sun. Apr 19th, 2026

*ऐन दिवाळीत पाण्यासाठी शिमगा , नगरपंचायतनी लाईट बील न भरल्याने लाईट कट* 

Bybaba maske

Oct 15, 2022

ऐन दिवाळीत पाण्यासाठी शिमगा , नगरपंचायतनी लाईट बील न भरल्याने लाईट कट 

नगरपंचायत चा भोगंळ कारभार 

केज प्रतिनीधी 

सगळीकडे पाऊसाचा हाहाकार पसरलेला असताना केज शहर मात्र पाण्यासाठी कासावीस झालेले आहे . केज धारुरसह १२ गाव पाणीपुरवठा असणाऱ्या धनेगाव तळ्यावर असलेल्या नळ योजनेचे कनेक्शन कट केल्याने शहरातील नागरिकांना पाण्यासाठी दिवाळीत शिमगा होणार असे दिसून येत आहे .
केज धारुरसह १२ गाव पाणीपुरवठा योजनेचा विज पुरवठा बील न भरल्याने खंडित केला आहे सुत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार दहा लाखाचे विजबील रखडले आहे यामधे धारुर नगर परिषदेने पाच व केज नगर पंचायत ने पाच असे बील भरल्यास विज पुरवठा सुरळीत होऊ शकतो परंतु जनरल हेड वरील पैसे इतरत्र खर्च केले जात असल्यामुळे विज बील भरायचे सोडून इतरत्र खर्च केले व विज वितरण नी विज खंडित केली त्यामुळे शहरातील नागरिकांना ऐन दिवाळी मधे पाण्यासाठी शिमगा करावा लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!