• Fri. Jun 5th, 2026

*भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांच्या गाडीचा मस्साजोग येथे अपघात.*

Bybaba maske

Oct 15, 2022

भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांच्या गाडीचा मस्साजोग येथे अपघात.

मस्साजोग प्रतिनीधी

बीड येथील कार्यक्रम आटोपून अंबाजोगाई कडे निघालेले भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आणि राम कुलकर्णी यांच्या गाडीला रिक्षाने धडक दिल्याने अपघात झाला.सुदैवाने यात दोघेही सुखरूप आहेत.

भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी हे बीड येथे एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आले होते.बीडचा कार्यक्रम संपल्यानंतर राम कुलकर्णी यांच्यासोबत ते अंबाजोगाई कडे निघाले होते.केज तालुक्यातील मस्साजोग येथे भंडारी यांच्या गाडीला रिक्षाने धडक दिली.

या अपघातात गाडीचे नुकसान झाले मात्र सुदैवाने भंडारी आणि कुलकर्णी हे दोघेही सुखरूप आहेत.या घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!