गौतम बचुटे/केज :- बीड जिल्ह्यातील धनेगाव ता केज येथील मांजरा प्रकल्प १००% पूर्ण भरला असल्याने मांजरा चार दरवाजे उघडले आहेत.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मांजरा नदीवर असलेला धनेगाव येथील मांजरा प्रकल्पाचे दोन दरवाजे आज रविवार दि. १६ ऑक्टोबर सकाळी ८;४५ दरवाजा उघडले आहेत. क्र १, ६, ३ व ४ हे ०.२५ मीटर उघडले असल्याची माहिती मांजरा प्रकल्पाचे अभियंता सूरज निकम यांनी आहे. त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असून प्रकल्पाच्या खालील गावांना इशारा देण्यात आला आहे. या चार दरवाज्यातून मांजरा नदीपात्रात ९८.९६ घन मीटर प्रति सेकंद म्हणजेच ३४९४.६७ घनफुट प्रति सेकंद एवढा विसर्ग सोडण्यात आला आहे.
पाण्याची आवक बघून विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल. नदी काठच्या जनतेने सतर्क रहावे. पूर नियंत्रण कक्ष मांजरा प्रकल्प धनेगावचे अभियंता सूरज निकम यांनी केले आहे