• Fri. Jun 5th, 2026

*सरपंच बापूराव घाडगे यांच्या प्रयत्नाने सातेफळ चिंचोली माळी महसुल मंडळात समाविष्ट*

Bybaba maske

Oct 16, 2022

*सरपंच बापूराव घाडगे यांच्या प्रयत्नाने सातेफळ चिंचोली माळी महसुल मंडळात समाविष्ट*

 

गौतम बचुटे/केज :- सातेफळचे सरपंच बापूराव घाडगे यांच्या प्रयत्नामुळे हे गाव आता चिंचोली माळी महसूल मंडळात समाविष्ट झाले आहे.
केज तालुक्यातील सातेफळ हे गाव पूर्वी युसुफवडगाव महसूल मंडळात समाविष्ट होते. परंतु सातेफळ हे कोरडवाहू पट्ट्यात तर युसुफवडगाव हे हरित पट्ट्यात आणि मांजरा धरणाच्या ओलिताखाली असल्यामुळे अवर्षण आणि दुष्काळी सवलती पासून वगळले जात होते. तसेच प्रशासकीय कामाच्या व भौगोलिक दृष्टीने दळणवळणासाठी गैरसोयीचे होते. ही बाब सरपंच बापूराव घाडगे आणि त्यांचे सहकारी उपसरपंच पांडुरंग भांगे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून त्याचा पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नाला अखेर यश आले. चिंचोली माळी महसूल मंडळात डोका या तलाठी सज्जात सातेफळ चा समावेश करण्यात आला. त्यामुळे साहजिकच सातेफळ आता युसुफवडगाव महसूल मंडळा ऐवजी चिंचोलीमाळी महसूल मंडळात समवविष्ट झाले आहे. या बद्दल गावकरी आणि शेतकऱ्यांनी सरपंच बापूराव घाडगे, उपसरपंच पांडुरंग भांगे आणि सदस्य यांचे कौतुक केले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!