• Fri. Jun 5th, 2026

*मटका बुक्कीवर पोलिससांची धाड !*

Bybaba maske

Oct 17, 2022

*मटका बुक्कीवर पोलिससांची धाड !*

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील विडा येथे पोलिसांनी मटका बुक्कीवर धाड टाकून एका विरुद्ध गुन्हा दाखल केला.

केज तालुक्यातील विडा येथील पंडित शिवाजी दूनघव हा इसम विडा-कोरडेवाडी चौकात कल्याण नावाचा जुगार घेत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना मिळताच त्यांनी बिट जमादार उमेश आघाव यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. दि.१५ ऑक्टोबर रोजी पोलिस जमादार उमेश आघाव आणि पोलिस नाईक बाळराजे सोनवणे यांनी कारवाई करून पंडित सखाराम दूनघव याला मटका घेत असताना मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४६९/२०२२ मुंबई जुगार कायदा कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करून पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!