• Fri. Jun 5th, 2026

*विहिरीत पडून वृद्धेचा मृत्यू*

Bybaba maske

Oct 17, 2022

 

*विहिरीत पडून वृद्धेचा मृत्यू*

 

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यात शौचास गेलेल्या एका वृद्ध महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे.

या बाबतची माहिती अशी की, सोमवार दि. १७ ऑक्टोबर रोजी। सकाळी ६:०० वा च्या दरम्यान केज तालुक्यातील उमरी येथील पारुबाई मरीबा कसबे वय (६५ वर्ष) ही महिला गावा जवळील शेतात शौचास गेली असता परत येत असताना सूर्यकांत राऊत यांच्या विहिरीत पडून मृत्यू झाला. माहीती मिळताच पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील पोलिस नाईक दिलीप गित्ते आणि शमीम पाशायांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहीरीच्या बाहेर काढला नंतर शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!