• Sun. Apr 19th, 2026

ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी :- वंचित बहुजन आघाडी 

Bybaba maske

Oct 17, 2022

ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी :- वंचित बहुजन आघाडी 

____

 या वर्षी परतीच्या पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने जिल्ह्यातील सोयाबीन कापुस मका बाजरी आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.शेतकरी वर्ग हवालदील झालेला आहे.मध्यंतरी ऑगस्ट मधे पावसाने महीनाभर दडी मारल्याने अगोदरच उत्पादनाचे प्रमाण कमी होतै..तरी सुद्धा पिकवीमा कंपनीने फक्त सतराच मंडळात आग्रही पिकवीमा देण्यांचे जाहीर केले होते..

 आता तर नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे. पिकवीमा कंपनीचे सर्व्हर डाऊन तर कधी नेटचा प्राॅबलेम तर अनेक शेतकरी वर्गाकडे मोबाईल च नाहीत त्यामूळे नुकसानीची माहीती पिकवीमा कंपनी कडे पाठवण्यास अडचण होत आहे.तेव्हा पिकवीमा कंपनीने आपले कार्यालय चौवीस तास उघडे ठेवुनी ऑफलाईन तक्रार नोंदवुन घ्याव्यात .तसेच ओला दुष्काळ जाहीर करून पंचनाम्याचा घाट न चालता सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा प्रतयेक तहसील कार्यालया समोर लवकरच घंटानाद आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिलाआहे..यावेळी वंचित बहुजन आघाडी चे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर कवठेकर पुरूषोत्तम वीर अजय सरवदे किरण वाघमारे लखन जोगदंड गणेश वीर राजु जोगदंड राजेंद्र कोरडे उमेश तुळवे ॲड.अनीता चक्रे सह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते..

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!