• Sun. Apr 19th, 2026

*केज तालुक्यात उस तोडणीच्या पैशावरून दोन गटात तुंबळ हाणामारी*

Bybaba maske

Oct 17, 2022

*केज तालुक्यात उस तोडणीच्या पैशावरून दोन गटात तुंबळ हाणामारी*

*परस्पर विरोधी गुन्हे दाखल*

 

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील एका गावात ऊस तोडणीच्या पैशा वरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली असून परस्पर विरोधी तक्रारी वरून पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या बाबतची माहिती अशी की, दि. शनिवार दि. १५ ऑक्टोबर रोजी युसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीतील बनकरंजा ता. केज येथे दिलीप बाबासाहेब नागरगोजे आणि भरत दशरथ नागरगोजे यांच्यात ऊस तोडणीसाठी दिलेल्या पैशा वरून तुंबळ हाणामारी झाली. यात दगड आणि विटांनी मारहाण करण्यात आली. तर एका मोटार सायकलीची मोडतोड करून नुकसान करण्यात आले.

या प्रकरणी विमल भारत नागरगोजे हिच्या तक्रारी वरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गु. र. नं. १६९/२०२२ भा. दं. वि. १४७, १४८, १४९, ३२३, ३२४, ५०४ आणि ४२७ नुसार दिलीप बाबासाहेब नागरगोजे, आशाबाई दिलीप नागरगोजे, अजय दिलीप नागरगोजे, बालासाहेब बाबासाहेब नागरगोजे, बाबासाहेब तुळसीराम नागरगोजे, पार्वती बाबासाहेब नागरगोजे या सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

तसेच आशाबाई दिलीप नागरगोजे हिच्या फर्यादी वरून गु. र. नं. १७०/२०२२ भा. दं. वि. १४७, १४८, १४९, ३२३, ५०४ नुसार भरत दशरथ नागरगोजे, दशरथ दादाराव नागरगोजे, कृष्णा लाटे, नामदेव पांडुरंग मुंडे, सोमनाथ भिमराव लांब, कौसाबाई दशरथ नागरगोजे, कमल भारत नागरगोजे या सात जणांच्या विरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार शेंडगे आणि पोलीस जमादार रंगनाथ राठोड हे अनुक्रमे या गुन्ह्यांचा तपास करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!