• Sun. Apr 19th, 2026

*केज-बीड रोडवर मस्साजोग जवळ एसटी व पिकअपचा भीषण अपघात*

Bybaba maske

Oct 17, 2022

*केज-बीड रोडवर मस्साजोग जवळ एसटी व पिकअपचा भीषण अपघात*

 

*दोघे गंभीर जखमी*

 

गौतम बचुटे/केज :- केज-बीड रोडवर मस्साजोग जवळ एस टी आणि पिकपचा गंभीर अपघात झाला असून अपघातात दोन मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णवाहीकेतून दवाखान्यात नेण्यात येत आहे.
सोमवार दि. १७ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वा. च्या दरम्यान केज-बीड रोडवर मस्साजोग जवळील हनुमंत पिंप्रीकडे जाणाऱ्या फाट्या जवळ सोयाबीन काढणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारे पिकअप क्र. (एम एच/३२/बी ९७३६) आणि धारूर आगाराची धारूर-मुंबई क्र. (एम एच-१४/बी टी-२५१५) यांचा अपघात झाला. या अपघातात सोयाबीन कापणीचे काम करणारे आदिनाथ घोळवे वय (३० वर्ष) रा. मुंडेवाडी आणि बाबासाहेब ठोंबरे वय (३६ वर्ष) रा. दहिफळ वडमाऊली हे दोघे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच १०८ क्र. रुग्णवाहिका चालक मकरंद घुले यांनी तात्काळ घटनास्थळी हजर होत जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविले आहे.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, जमादार उमेश आघाव, पोलीस जमादार देवकते, पोलीस नाईक बाळराजे सोनवणे, पोलीस नाईक महादेव बहिरवाळ यांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना मदत केली.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!