• Sun. Jul 26th, 2026

तहसीलदार साहेबांच्या आदेशाची पायमल्ली मंडळ अधिकारी व तलाठ्यां कडुन.  

Bybaba maske

Oct 17, 2022

तहसीलदार साहेबांच्या आदेशाची पायमल्ली मंडळ अधिकारी व तलाठ्यां कडुन.

 

आठ दिवसांत मागणी पूर्ण न झाल्यास आयुक्त कार्यालया समोर अंदोलन.एमआयएमचे शहर अध्यक्ष तालेब इनामदार 

 

रोखठोक वार्ताहर 

 

महाराष्ट्र शासकाच्या आदेशाप्रमाणे शासकीय कर्मचार्यांनी ज्या ठिकाणी सेवा आहे त्याच ठिकाणी रहाण्याचे आदेशीत केले आहे. मात्र केज महसुल मंडळाच्या अंतर्गत येणारे तलाठी , मंडळ अधिकारी सेवेच्या ठिकाणी न रहाता तालुक्याच्या ठिकाणाहुन ये जा करत आहेत त्यामुळे सज्जाच्या ठिकाणी रहाणारे रहिवाशी तथा विद्यार्थी यांना वेगवेगळे प्रमाणत्र काढण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी ये – जा करावी लागते व त्यांचे वेळेवर काम होत नाही . म्हणुन केज तालुक्याच्या महसुल मंडळाअंतर्गत येत असलेल्या तलाठ्यानी तथा मंडळ अधिकारी यांनी सेवेच्या ठिकाणीच रहावे असे निवेदन एमआयएम चे शहराध्यक्ष तालेब इनामदार यांनी एक वर्षा पासुन दि.18/10/2021रोजी दिले होते त्या नंतर 20/10/21 रोजी तहसीलदार साहेबांनी आदेश काढून मुख्यालयी रहाण्याचे सुचीत केले असताना सुद्धा कर्मचारी मुख्यालयी रहात नाहीत तसेच प्रत्येक तलाठ्या कडे राईटर म्हणून बाहेर ची व्यक्ती काम पहाते,ते राईटर सुद्धा काढावे अशी मागणी तहसिल कार्यालयात दिलेल्या निवेदनात केली आहे. जर ही मागणी आठ दिवसांत मान्य न झाल्यास विभागीय आयुक्त औरंगाबाद येथे उपोषण किंवा धरणे अंदोलनाचा इशारा एमआयएम शहर अध्यक्ष तालेब इनामदार यांनी दिला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!