• Sun. Apr 19th, 2026

*एच पी एमला आणखी किती नरबळी हवे आहेत ?10 तारखे पासून आमरण उपोषण*.

Bybaba maske

Oct 19, 2022

*एच पी एमला आणखी किती नरबळी हवे आहेत ?*

अपघात झाल्यास कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा:- वंचित बहुजन आघाडी

रोखठोक वार्ताहर 

केज :- केज शहरात मागील अनेक दिवसांपासून एच पी एम कंपनी करत असलेली रस्त्यांची कामे बंद आहेत.मुख्य रस्ता देखील अत्यंत संथ गतीने व रखडत रखडत कंपनीने केला आहे. त्यामुळे आजवर अनेक अपघात झाले आहेत त्यातील धारुर चौकात  ऊसाच्या ट्रक खाली दबून अपघातात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे.अनेक संघटनांनी,पक्षांनी या विरोधात आवाज उठवला मात्र निगरगट्ट असणाऱ्या एच.पी.एम कंपनीला घाम फुटला नाही.सगळ्या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य आहे.ते एक कारण अपघाताचे आहे.उपजिल्हा रुग्णालया बाहेर महिला पेशंट डोळे तपासून बाहेर निघताच एसटी अपघातात महिला जागीच ठार झाली.त्या ठिकााणी उताराचा रस्ता आहे तिथे गतिरोधक असणे गरजेच आहे.बस स्टॉप निवारे नाहीत उन पावसात बसची वाट बघत उघड्यावर थांबावे लागते.मोठ मोठे झाडे तोडली पण एक ही झाड रस्त्याच्या दुतर्फा लावले नाहीत.

        केज शहरांतर्गत बंद असलेली कामे एच.पी.एम कंपनीने शहरातील रस्ते,नाली चौकाच्या परिसरातील कामे बऱ्याच दिवसांपासुन बंद असुन ती कामे ऊस गळीत हंगामाच्या अगोदर पूर्ण करावीत कारण केज शहरालगत दोन सहकारी साखर कारखाने असल्यामुळे ऊस वाहतुक करणारे वाहने ट्रक , ट्रॅक्टर , बैलगाडी यांची वाहतुक चालु होते, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते. गेल्या ऊस हंगामात जयभवानी चौकात ऊसाच्या ट्रकाखाली दोन तरुण व्यक्ती सापडुन जागीच ठार झाले होते . त्या अनुषंगाने एच.पी.एम कंपनीने रखडलेले काम तात्काळ करुन डिवायडरवर जाळी बसवावी कारण माणसे, मुले रस्ता क्रॉस करताना अपघात होऊ लागले आहेत. कंपनीच्या निष्काळजी पणामुळे जर अपघात झाला तर कंपनीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

   रोडला साईटपटटी कलर , अपघात प्रवण क्षेत्रात गतीरोधक किंवा स्टीपर बसवण्यात यावे, केज़ शहरातून जाणाऱ्या नालीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे व काही बाकी आहे.नाली फक्त देखाव्या साठीआहे पाणी सगळे रस्त्यावरून वहाते,गल्लीत जाणारे रोड तात्काळ जोडण्यात यावेत या मागण्या एच पी एम कंपनीने तात्काळ पूर्ण कराव्यात अन्यथा १० नोव्हेंबर २०२२ रोजी केज तहसिल कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी केज शहरातर्फे आमरण उपोषण करण्यात येईल असा खणखणीत इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर बाबासाहेब आंबादास मस्के,उत्तम वाघमारे,धनराज सोनवणे,सलीम तांबोळी,संतोष वळसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!