• Sun. Apr 19th, 2026

*केज पुरवठा नायब तहसीलदारांची संगीत खुर्ची व्यक्ती एक पदभार तीन.*

Bybaba maske

Oct 19, 2022

*केज पुरवठा नायब तहसीलदारांची संगीत खुर्ची*

व्यक्ती एक पदभार तीन.

रोखठोक वार्ताहर 

केज पुरवठा नायबतहसीलदार साहेबांची संगीत खुर्ची चालू आहे,बीड जिल्यात काम करणारे एकमेव तहसीलदार असतील बीड प्रशासनाचा त्यांच्या वर एवढा विश्वास आहे की त्यांना दोन पदाचा अतिरिक्त चार्ज दिला आहे.त्यामुळेच त्यांची संगीत खुर्ची चालू आहे.केज पुरवठा नायबतहसीलदार म्हणून नियुक्ती असताना त्याच्या कडे बीड तहसीलदार पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला तो थोडा होता की काय केज नगरपंचायत चा मुख्याधिकारी म्हणून सुद्धा पदभार दिला.त्या मुळे कधी बीड, तर कधी केज तहसील, तर कधी नगरपंचायत, केज तहसील पुरवठ्याला तर वालीच नाही,मागे काही दिवसा पुर्वीच रोखठोक ने बातमी दिली होती ग्राहकाचे गॅस सिलेंडर सरास व्यावसायिक ग्राहक राजरोस उघड्यावर ठेवून वापरत आहेत.त्या वर कोणतीच कारवाई झाली नाही,दिवाळी सारखा मोठा सण आला असताना गॅस टंचाई भासु शकते पण कारवाई कोण करणार साहेब तर बीडला,नगरपंचायत चे सुद्धा तेच हाल. सत्ताधारी नगरसेवकाने नगराध्यक्ष व मुख्याधिकारी विरोधात अनियमितीचे आरोप करून निवेदन दिले आहे.तीन चार दिवसांवर दिवाळी आली असताना गरीबांचे राशन अजून पंर्यत राशन दुकानात पोहचले नाही.शभंर रूपयात राशन चा अजून पत्ता नाही.या सगळ्या कडे लक्ष देण्याची मागणी जनतेतून होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!