*बीड जिल्हा काँग्रेस व गंगा माऊली शुगरच्या वतीने मांजराचे जलपूजन !*
—————————–
केज दि.१९(प्रतिनिधी) :- बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्याची तहान भागवणारे मांजरा धरण सलग तिसऱ्या वर्षीही पूर्ण क्षमतेने भरले असून धरण भरण्याची हॅट्रीक झाली आहे. हे धरण भरल्यामुळे या भागातील शेतकरी देखील मोठ्या आनंदात आहेत. या निमित्ताने दि.१९ रोजी मांजरा धरणावर बीड जिल्हा काँग्रेस कमिटी व गंगा माऊली शुगर कारखाना यांच्या वतीने जलपुजनाचा कार्यक्रम संपन्न होऊन काॅग्रेसचे युवक नेते तथा माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील, बीड जिल्हा कॉंग्रेस कमीटीचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, गंगा माऊली शुगरचे उपाध्यक्ष हनुमंत मोरे, जिल्हाउपाध्यक्ष राहुल सोनवणे, सुरेश पाटील यांच्या हस्ते जलपूजन पार पडले.
या वेळी धरणाची विधिवत पूजा करून मान्यवरांच्या हस्ते जलदेवतेला खण- नारळ अर्पण करण्यात आले. या वेळी आदित्य पाटील म्हणाले की, पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने धरण भरले परंतु शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन हातातून गेले आहे. यासाठी बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांना सरसकट नुकसानीची नोंद करून पंचनामे करण्यात यावेत यासाठीम निवेदन देऊन चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी राजेसाहेब देशमुख यांनीही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व विमा मिळावा यासाठी काँग्रेस पक्ष आग्रही असून शेतकऱ्यांना न्याय मिळायलाच हवा. हीच आमची प्रमुख मागणी असल्याचे म्हणाले. या गळीत हंगामापासून आपल्या हक्काचा गंगामाऊली शुगर कारखाना प्रतिदिन ६ हजार टन याप्रमाणे उस गाळप करणार असून आता कोणत्याही शेतकऱ्याने उसासाठी बेजार होण्याचे कारण नाही. पाऊस भरपूर झाला आहे. ऊस देखील मोठ्या प्रमाणात लागवड करा. असे आवाहन केले.
या प्रसंगी गंगा माऊली शुगरचे अविनाश मोरे, सुरेश पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अमर पाटील, कपिल मस्के, डॉ. कविता कराड, संगिता साळवे, माजी नगराध्यक्ष कबीरोद्दिन इनामदार, दलील इनामदार, प्रताप मोरे, संभाजी देशमुख, संतोष सोनवणे, शेतकरी प्रविण खोडसे, आकाश गायकवाड, दिलीप पाटील, अरुण गुंड, समिर देशपांडे, मुन्ना ठोंबरे, दिनकर राऊत, सचिन रोडे, गंगामाऊली शुगर केजचे मुख्य शेतकी अधिकारी अविनाश आदनाक यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थिती होते.