• Sun. Jul 26th, 2026

*केज तालुक्यामध्ये मग्रारोहयोवरील कामाच्या रेकॉर्डवर धक्कादायक नोंदी*  

Bybaba maske

Oct 20, 2022

केज तालुक्यामध्ये मग्रारोहयोवरील कामाच्या रेकॉर्डवर धक्कादायक नोंदी

 

टाकळीत मजुरी कामावर शिक्षक, काम एकाचे बिल दुसऱ्यालाच

 

रोखठोक वार्ताहर  

तालुक्यातील मग्रारोहयोअंतर्गत करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीत चौकशी समितीला रेकॉर्डमध्ये अनेक धक्कादायक नोंदी दिसून आल्या. काही ठिकाणी शिक्षकासदेखील मग्रारोहयो योजनेच्या कामावर दाखविण्यात आल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकांच्या समितीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या चौकशी अहवालात नमूद केले आहे.

तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतीने मग्रारोहयो योजनेच्या कामात भ्रष्टाचाराची तक्रार झाल्यानंतर तालुक्यातील ग्रामपंचायतींनी मग्रारोहयो योजने अंतर्गत केलेल्या विविध कामांची २० चौकशी पथकाद्वारे सखोल चौकशी करण्यात आली. या पथकाने केलेल्या चौकशीत आढळलेल्या धक्कादायक माहितीचा अहवाल ११ ऑगस्ट २०२१ रोजी सीईओंकडे सादर केला होता.

मजुरांच्या हजेरीपटावर शिक्षकाची नोंद

तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायतने चौकशीदरम्यान यंत्राने कामे केल्याचे तसेच बांध बंदिस्तीच्या कामावर दिनांक ६ ते १० जून २०२० या कालावधीत शिक्षक असलेले विलास महादेव घुले यांची हजेरी पटावर नोंद करत मग्रारोहयो योजनेच्या रकमेत भ्रष्टाचार केल्याचे चौकशी समितीस आढळले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे..

झाडे न लावताच उचलले पैसे

तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीनी वृक्षारोपण न करताच केल्याचे दाखवत पैसे उचलले होते. मात्र याची चौकशी चालू होताच यंत्रांचा वापर करून झाडे लावली असल्याचे चौकशी पथकास दिसून आले तर अनेक ठिकाणी झाडे जळालेली आढळून आली. तर काही ठिकाणी जास्तीचे मजूर दाखवत योजनेच्या कामात भ्रष्टाचार करण्यात आला.

कामे न करता अपहार

■ बांध बंदिस्तीची कामे न करताच ती केल्याचे दाखवत अपहार करण्यात आला.

■ तालुक्यातील गोटेगाव येथे बांध बंदिस्तीचे भाग क्र. एक व दोनचे काम दिसून येत नसल्याचे अहवालात नमूद केले आहे.

सांगवी (सा) येथे काम न करताच पैसे परस्पर उचलले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

जलसिंचन विहीर कामातही भ्रष्टाचार

मग्रारोहयोअंतर्गत करण्यात आलेल्या जलसिंचन विहिरीच्या कामातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. काम एकाचे आणि बिल दुसऱ्यालाच असे प्रकारही विविध गावातील कामात दिसून

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!