अजून एक नगरसेवकाचा नगरपंचायतला इशारा, जेवढे आला निधी तेवढा द्या
नगरसेवक अझरोद्दीन इनामदार यांचा इशारा
केज केज येथील नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. 1 मध्ये प्रशासकीय मान्यता प्राप्त कामांमध्ये बदल न करता निधी उपलब्ध असलेली कामे तात्काळ निविदा प्रक्रिया करून पूर्ण करण्यात यावेत. अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा या प्रभागाचे नगरसेवक अझरोद्दीन इनामदार यांनी मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
प्रभाग क्र. 1 मध्ये पाणी पुरवठा सुरळीत नसून रस्ते, नाल्यांची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे प्रभागातील विकास कामे मार्गी लावणे गरजेचे आहे. या प्रभागात प्रशासकीय मान्यता प्राप्त कामांमध्ये बदल न करता निधी उपलब्ध असलेली कामे तात्काळ निविदा प्रक्रिया पूर्ण करून सदरील कामाचे कार्यारंभ आदेश देऊन पूर्ण करण्यात यावेत. ही कामे सुरू करण्याबाबत या प्रभागाचे नगरसेवक अझरोद्दीन इनामदार यांनी वारंवार तोंडी, लेखी सांगून व पाठपुरावा करूनही या कामसंदर्भात कुठल्याही प्रकारची प्रक्रिया सुरू केलेली नाही.