• Sat. Jun 20th, 2026

*चार दिवसा पासुन गाव सगळ अंधारात.पाणी,पीठ वीज गायब गावकरी आक्रमक.*

Bybaba maske

Oct 20, 2022

चार दिवसा पासुन गाव सगळ अंधारात.पाणी,पीठ वीज गायब गावकरी आक्रमक.

केज वार्ताहर 

दिवाळी अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली असताना तालुक्यातील सोनिजवळा येथील गावठाण रोहित्र ( डीपी) जळाला आहे. यामुळे गावात आठ दिवसांपासून अंधार आहे. गावातील गिरण्या बंद असल्याने घरातील पीठ , वीजे अभावी पाणी संपलं आहे. यामुळे ग्रामस्थांना बाहेरुन दळण आणि पाण्यासाठी रानोमाळ भटकंती सह विविध समस्यांचा सामना करावा लागतो आहे. यामुळे महावितरण कंपनीच्या कारभारा विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

वर्षातील सर्वात मोठा आणि प्रकाशाचा सण म्हणून दिवाळीकडे पाहिले जाते. यादिवशी खूप प्रकाश व दीप लावून आनंदात दिवाळी साजरी करण्यात येते. पण यावर्षी सोनिजवळा ( ता. केज ) येथील ग्रामस्थांची दिवाळी अंधारात जाणार का? असे चित्र निर्माण झाले. कारण येथील गावठाण विद्युत रोहित्र ( डीपी ) जळाला आहे. याला तब्बल आठ दिवस झाल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. तसेच मागील आठवडाभरापासून गाव अंधारात चाचपडत असून, याकडे कोणाचेच लक्ष नाही. गावात सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रानोमाळ भटकंती करून पाणी आणावं लागतं आहे. गावातील पिठाच्या गिरण्या बंद असल्याने घरातील पीठ संपलं आहे. तसेच सर्वच विद्युत उपकरणे बंद आहेत. यामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याने ग्रामस्थ मेटाकुटीला आले आहेत. याकडे कोणाचेच लक्ष नसल्याने ग्रामस्थ महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे  सांगितले आहे.

baba maske

Related Post

नगरपंचायतीच्या दुर्लक्षाचा फटका? रस्त्यालगत साचलेल्या कचऱ्याला आग; खाजगी टिप्पर जळून खाक कित्येक दिवस कचरा न उचलल्याचा आरोप; नागरिकांमध्ये संताप, नुकसानभरपाईची मागणी
“आणखी किती बळी घेतल्यावर जागे होणार शासन?”माजलगाव-तेलगाव मृत्यूमार्ग ठरला; रस्त्यावरील भेगेने घेतला आणखी एका महिलेचा जीवनिष्काळजी प्रशासन आणि ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
अंबाजोगाईत गुंडगिरीचा कळस! बारावीच्या विद्यार्थ्यावर मध्यरात्री प्राणघातक हल्ला; डोक्यात दांडक्याचे घाव, प्रकृती चिंताजनक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!