लोखंडीसावरगाव ते माळेगाव ,राज्य मार्ग बनला पांदण रस्ता
(राज्य महामार्गावर गुडघाभर खड्डे, पाणी अन चिखल)
अपघाताचे प्रमाण वाढले,एका वर्षात १७ बळी
—————————–
केज दि २१(प्रतिनिधी)
कळंब -अंबाजोगाई राज्य महामार्गावरील माळेगाव ते लोखंडी सावरगाव दरम्यान पालखी महामार्ग रस्त्यावर गुडघाभर खड्डे पडले आहेत.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतोय मात्र गुडघाभर खड्डे अजूनही भरायला तयार नाहीत या खड्ड्यात पाणी साचलेले आहे. वाहन चालवणे कठीण झाले आहे खड्ड्यात वाहन जाऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महामार्गाचे काम तात्काळ करावे अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
माळेगाव ते लोखंडी सावरगाव दरम्यान असलेला राज्य महामार्ग रस्ता पांदन रस्ता झाला आहे खोल खड्डे पडले आहेत रस्त्यावर कुठेही डांबर आढळत नाही. थोडेफार राहिलेले दगड गोटे वाहून गेले आहेत यामुळे वाहन चालवणे अवघड झाले आहे. या रस्त्यावरून दळणवळण करणाऱ्या प्रवाशांना मनक्याचे आजार जडले आहेत. वाहनांचं नुकसान ही मोठ्या प्रमाणात होत आहे.
—————–चौकट——
माळेगाव ते लोखंडी सावरगाव रस्त्यासाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे लवकरच निविदा जाहीर होऊन काम सुरू होईल.तात्पुरता खड्डे बुजवण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. अधिकचा निधी मागणी करून पाठपुरावा सुरू आहे.
आमदार नमिता मुंदडा
——————————-
खराब रस्त्यांमुळे गेल्या एक वर्षात अपघातामध्ये 17 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे रस्ते दुरुस्त न झाल्यास हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही
गेल्या कित्येक वर्षापासून हा रस्ता प्रतीक्षेत आहे कोविडच्या कालावधीमध्ये निधी प्राप्त झाला नाही. रस्त्या करिता अनेक वेळा आंदोलनेही करण्यात आली आहेत निवेदन देण्यात आलेले आहेत मात्र तात्काळ दुरुस्ती काही होत नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे नीट बुजवले अस वाहतूक करणे अवघड होणार असल्याच्या प्रतिक्रिया वाहनचालक देत आहेत.
——चौकट—–
खड्ड्यातून गाडी वर काढावीच कशी?
रस्त्यावरून वाहन चालवताना मुख्य रस्त्यावर गुडघाभर खड्डे
त्यात पाणी साचल्याने वाहन चालवताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अनेक वेळा चा खड्ड्यात जाऊन गाड्या पलटी झालेले आहेत. गुडघाभर खड्ड्यात गेलेली गाडी वर कशी काढावी याची भीती वाटते
वाहनचालक
———————-
खड्ड्यामुळे अनेक वेळा अपघात झाले आहेत प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात आहे.
माळेगाव, गोटेगाव, मोठेगाव सुर्डी ,सोनेसांगवी,युसूफवडगाव पाथरा, पैठण, सावळेश्वर आनंदगाव, आवसगाव,वाकडी,जवळबन,लाडेगाव,बोरीसावरगाव बनसारोळा ,पळसखेडा डीघोळआंबा ,लोखंडी सावरगाव आधी गावचे शेतकरी विद्यार्थी प्रवासी वाहन चालक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत तात्काळ रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी केली जात आहे
———–चौकट—-
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास मृत्यू ला कारणीभूत ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करायला हवेत अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे
————
