• Fri. Jun 5th, 2026

*’पहिली’ असताना ‘दुसरी’ केली ! अन् त्या विवाहाचे प्रमाण-पत्र ‘पहीलीला’ शेअर केले !*

Bybaba maske

Oct 21, 2022

*’पहिली’ असताना ‘दुसरी’ केली ! अन् त्या विवाहाचे प्रमाण-पत्र ‘पहीलीला’ शेअर केले !*

 

*एक लाख रु. साठी विवाहितेचा छळ !*

 

गौतम बचुटे/केज :- पहिलाचा एक लाखा साठी छळ केला आणि त्या नंतर पहिली असताना दुसरी केली अन् त्या दुसऱ्या लग्नाचे विवाह नोंद प्रमाणपत्र मुद्दाम चक्क पहिलीलाच शेअर केल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी छळवणूक आणि द्विभार्या प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथे पुष्पा नानभाऊ ठोंबरे हिला तिचे सासरी माहेरहून एक लाख रु घेऊन ये म्हणून शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच तिचा नवरा नानाभाऊ ठोंबरे याने दि. २० ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १२:०० वा. च्या सुमारास फिर्यादी पहिली पत्नी पुष्पा हिचे आई-वडीलांचे मोबाईलवर त्याने सांगवी ता. केज येथील धनश्री भास्कर धस हिच्या सोबत देवाची आळंदी येथील रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयात केले. पहिली जिवंत असताना दुसरी सोबत पाट मांडला. त्याच्या विवाह नोंदणी प्रमाण पत्र हे पहिली पत्नी पुष्पा हिचे आई-वडीलांचे मोबाईलवर शेअर केले.

पीडित विवाहिता पुष्पा नानाभाऊ ठोंबरे हिच्या तक्रारी वरून तिचा नवरा नानाभाऊ मधुकर ठोबरे, सासू सर्जना मधुकर ठोंबरे, सासरा मधुकर सुर्यभान ठोंबरे, दीर कृष्णा मधुकर ठोंबरे व जाऊ अश्वीनी कृष्णा ठोंबरे सर्व रा. दहीफळ यांच्या विरुद्ध गु.र.नं. ४७६/२०२२ कलम ४९८ (अ), ४९४, ३२३, ५०४, ५०६, आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदूर घाट दूरस्थ पोलीस चौकीचे हेडकॉन्स्टेबल अभिमान भालेराव हे करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!