• Sun. Apr 19th, 2026

*मस्साजोग जवळ कारला मालवाहू रिक्षाची मागून धडक*

Bybaba maske

Oct 23, 2022

मस्साजोग जवळ कारला मालवाहू रिक्षाची मागून धडक

 

गौतम बचुटे/केज :- केज-बीड रोडवर मस्साजोग येथील हॉटेल समोर एका उभ्या कारला मालवाहू पिकअप रिक्षाने पाठीमागून धडक दिली. यात कारचे नुकसान झाले परंतु सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही.

केज-बीड रोडवर केजकडे येणारी टोयाटो ग्लान्झा (एम एच २०/एफ जी- ५४९१ ) ही कार मानसी हॉटेल समोर उभी असताना; त्या गाडीला पाठी मागून येणारी मालवाहू पिकअप रिक्षा (एम एच-२३/ए यु-२५६१) याने जोराची धडक दिली यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या अपघातात दुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. अपघाता नंतर दोन्ही वाहने केज पोलीस ठाण्यात आणली असून या अपघात प्रकरणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात येत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!