• Fri. Jun 5th, 2026

*उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून चाकूने भोकसले*

Bybaba maske

Oct 23, 2022

उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून चाकूने भोकसले

 

गौतम बचुटे/केज :- हात उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून एकाला चाकूने भोकसल्याचा प्रकार केज तालुक्यात घडला आहे.

केज तालुक्यातील कानडी माळी येथील श्रीकांत अर्जुन खाडे याने बऱ्याच दिवसा पूर्वी गोविंद वसंत खाडे याला काही पैसे हात उसने दिले होते. रविवार दि. २३ ऑक्टोबर रोजी श्रीकांत खाडे याने ते पैसे गोविंद खाडे यास परत मागितले म्हणून त्याचा गोविंद खाडे यास राग आला. त्या रागातून गोविंद खाडे याने श्रीकांत खाडे यास शिवीगाळ केली आणि त्याच्या जवळ असलेल्या एका छोट्या चाकूने पोटाच्या डाव्या बाजूला मारून जखमी केले.

श्रीकांत खाडे यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात गोविंद खाडे याच्या विरुद्ध गु. र. नं. ४८२/२०२२ भा. दं. वि. ३२४, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करून प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस नाईक दिलिप गित्ते हे करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!