• Fri. Jun 5th, 2026

*पुत्र झाला ऐसा गुंडा ; त्याने घातला आईच्या डोक्यात दांडा !*

Bybaba maske

Oct 24, 2022

पुत्र झाला ऐसा गुंडा ; त्याने घातला आईच्या डोक्यात दांडा !

 

शेत नावावर करण्यासाठी मुलाने केली आई-वडिलांना मारहाण !

गौतम बचुटे/केज :- पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. असे एक संतवचन आहे. परंतु हल्ली आता आई-वडिलांना मारहाण करण्याच्या अनेक घटना घडत आहेत. केज तालुक्यात अशीच एक घटना घडली. त्यामुळे आता त्या आई-वडिलांवर असे म्हणावे लागण्याची वेळ आली आहे की, पुत्र झाला ऐसा गुंडा; ज्याने घातला आईच्या डोक्यात दांडा.
साळेगांव ता. केज येथे रविवार दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:३० वा लिंबराज गुंडीबा बचुटे याने त्याचे वडील गुंडीबा बचुटे आणि सावत्र आई शांताबाई बचुटे यांना शेत नावावर का करीत नाहीत. म्हणून त्यांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सावत्र आई शांताबाई बचुटे हिच्या डोक्यात लाकडी दांडा मारून दुखापत केली.
शांताबाई बचुटे यांच्या तक्रारी वरून सावत्र मुलगा लिंबराज बचुटे याच्या विरुद्ध दि. २३ ऑक्टोबर रोजी केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४८१/२०२२ भा. दं. वि. ३२४, ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे हे पुढील तपास करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!