• Wed. Apr 22nd, 2026

*आनंदाचा शिधा’ वाटप न झाल्या मुळे गोरगरीबांची दिवाळी कडूच*

Bybaba maske

Oct 24, 2022

आनंदाचा शिधा’ वाटप न झाल्या मुळे गोरगरीबांची दिवाळी कडूच 

 

गरीब व गरजू लोक दिवाळी कशी साजरी करणार?

 

रोखठोक वार्ताहर 

 राज्य शासनाने राज्यातील रेशन कार्डधारकांना दिवाळी साजरी करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानातून आनंदाचा शिधा योजनेअंतर्गत साखर, रवा, चना डाळ, तेल आदी साहित्य असलेल्या बॅग दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी देण्याचे जाहीर केले. मात्र, दिवाळीचा सण आला तरी या बॅगमधील साहित्य कमी आल्याने तालुक्यातील स्वस्त धान्य ग्राहक आनंदाच्या शिध्यापासून वंचित राहिले आहेत.

केज तालुक्यात ४८ हजार १३ शेतकरी, अंत्योदय, अन्नसुरक्षा योजनेचे रेशनकार्ड धारक ग्राहक आहेत. या रेशनकार्ड धारकांना दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी राज्य शासनाने आनंदाचा शिधा (शिधा जिन्नस संच) अंतर्गत साखर, रवा, चनाडाळ, तेल, प्रति एक किलोची साहित्य असलेली बॅग एका रेशनकार्ड धारकास शंभर रुपयास देण्याचे जाहीर केले. यासाठी हे साहित्य वितरण करण्यासाठी कंत्राटदारही नियुक्त केले.

मात्र, दिवाळीच्या सणाच्या पूर्वसंध्येला आनंदाच्या शिध्यामध्ये असलेल्या चार वस्तूंपैकी केज गोडाऊनमध्ये चणाडाळीच्या ९ हजार बॅग, साखरेच्या ३६ हजार ९५० बॅग, रव्याच्या २४ हजार ९९० बॅग आल्या आहेत.तर यामधील तेल आलेच नाहीतर

तालुक्यातील युसूफ वडगाव गोडाऊनला आनंदाच्या बॅगमध्ये सण कसा साजरा करावा, असा सवाल समाविष्ट असलेली एकही वस्तू  आलेली नव्हती.

त्यामुळे तालुक्यातील रेशनकार्ड धारकांना हा आनंदाचा शिधा असलेल्या बॅगा स्वस्त धान्य दुकानदारांना वितरित करण्यात आल्या नसल्याने हा आनंदाचा शिधा त्या स्वस्त धान्य ग्राहकांना येणार दिवाळीच्या सणाच्या पूर्व संध्येपर्यंतही विभागाकडून मिळाल्या नसल्याने त्यांनी दिवाळीचा येत आहे.

याबाबत जिल्हा पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधला जात असून, या वस्तू पुरविण्याची मागणी केली जात आहे. या वस्तू केज तहसील कार्यालयातील पुरवठा विभागास हे धान्य कीट मिळताच वाटप करण्यात असल्याचे तहसील कार्यालया कडुन सांगण्यात आले.

मागणीप्रमाणे साहित्य आले नाही

आनंदाच्या शिधामध्ये समाविष्ट असलेले साहित्य केजसाठी चणाडाळ, रवा, साखर हे कमी प्रमाणात आले आहे. तर तेल आलेच नाही.

तर युसुफवडगाव गोडाऊनसाठी चार वस्तूंमधील एकही वस्तू आली नाही. आनंदाचा शिधामध्ये समाविष्ट असलेले साहित्य मागणीप्रमाणे आलेले नाही.

तसेच हे साहित्य देण्यासाठी पिशव्याही आल्या नाहीत. यामुळे आनंदाच्या शिधामधील वस्तूंचे वाटप करणे रखडले आहे. यामध्ये मार्ग काढणे सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

या साहित्याचे वितरण करण्यात आले नाही, अशी माहिती पुरवठा विभागाच्या लिपीक टी. के. उमरे यांनी ‘रोखठोक”ला दिली.

baba maske

Related Post

ऽऽबस झाल्या घोषणांच्या रिकाम्या तुताऱ्या; आता हव्यात कार्यान्वित मुताऱ्या..! “सामुदायिक मूत्रविसर्जन” आंदोलनाची चर्चा जोरात
केज नगरपंचायतीचे दुर्लक्ष; नागरिकांना मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सोडल्याचा आरोप. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याला १० दिवस उलटले; अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना नाही. कुत्र्याने ४० नागरिकांवर हल्ला करत अनेकांना जखमी केले होते
केजमध्ये ‘बुद्धंम शरणम् गच्छामि’ संगीतमय महानाट्याचे भव्य आयोजन फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन – भाई मोहन गुंड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!