• Wed. Apr 22nd, 2026

*केज येथे उसतोड मजुरांचा टेम्पो अडवून टेम्पो चालकाला जबरदस्तीने पळवून नेले : पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल*

Bybaba maske

Oct 24, 2022

केज येथे उसतोड मजुरांचा टेम्पो अडवून टेम्पो चालकाला जबरदस्तीने पळवून नेले : पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

 

गौतम बचुटे/केज :- परभणी जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांना सोलापूर जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी घेऊन जात असलेला टेम्पो केज येथे अडवून चालकाला एका गाडीत बळजबरीने बसवून पळवून नेले आणि त्यांना मारहाण केली. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात पंधरा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी जिल्ह्यातील अंगलगाव ता. जिंतूर येथील प्रदिप साहेबराव राठोड हा त्याच्या मालकीच्या आयशर टेम्पो-१११० क्र. ( एम एच-२६/ए डी-१४७) ने इटोली ता. जिंतूर येथून उडतोड मुकादम श्रीराम बळीराम जाधव रा. घेवडा ता. जिंतूर यांचे १४ ऊसतोड मजूर व त्यांची ४ मुले यांना घेऊन सोलापूर जिल्ह्यातील सापटने (भो.) ता. माढा येथे जात होता. त्यांना दि. २२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२:३० वा. केज-अंबाजोगाई रोडवर केज येथे एका लाल रंगाचा बोलेरो गाडी आडवी लावून टेम्पो अडविला. त्या नंतर एक बोलेरो व दोन स्कॉर्पिओ गाड्याती १५ लोकांनी हातात प्लस्टिकचे दांडे घेऊन आयशर टेम्पोत चढून त्यांनी प्रदीप राठोड याचा मोबाईल काढून घेतला तर इतरांनी मजुरांचेही मोबाईल काढून घेतले आणि त्यांच्या मागे गाडी घ्या म्हणून धमकी दिली. प्रदीप राठोड यांनी नकार देताच त्यांनी प्रदीप राठोड आणि मजुरांना दांड्यानी मारहाण केली व टेम्पोचा काच फोडला. चालक प्रदीप याला टेम्पोतून खाली ओढून लाल रंगाच्या बोलेरो गाडीत बसविले आणि टेम्पो व त्यातील मजुरासह त्यांना सोलापूर जिल्ह्यातील कव्हे ता. माढा येथे घेऊन गेले. त्यांचा मुकादम याने ही माहिती कुर्डुवाडी जि. सोलापूर पोलीस ठाण्यात देताच कुर्डुवाडी पोलिसांनी मजुरांना घेऊन उपचारासाठी दवाखाण्यात नेले. नंतर त्याने केज पोलिस ठाण्यात हजर होऊन यांना पळवून घेऊन जाणारा मुकादम राहुल चोपडे आणि त्याचे इतर १४ साथीदार अशा १५ जणांच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ४८४/२०२३ भा. दं. वि. १४३, १४७, १४८, १४९, ३६५, ३४१, ३२७, ३२४, ३२३, ४२७ या प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

काय आहे प्रकरण ?

टेम्पो चालक प्रदीप राठोड याने पिनू चव्हाण व राहुल चोपडे याच्या कडून ऊस तोड मजुरांसाठी उचल घेतली होती. परंतु प्रदीप राठोड हा ऊसतोड मुकादम श्रीराम जाधव यांच्या सोबत उसतोड मजूर घेऊन जात होता. तो पिनू चव्हाण व राहुल चोपडे यांना तो दुसरे उडतोड मजूर देतो म्हणाला होता. तरी त्यांनी ऐकले नाही. परिणामी राहुल चोपडे यांनी गुंडाच्या मदतीने प्रदीप राठोड यास पळवून नेले. असा हा ऊसतोड मजुरीच्या व्यवहारातून घडेलेला प्रकार आहे.

baba maske

Related Post

ऽऽबस झाल्या घोषणांच्या रिकाम्या तुताऱ्या; आता हव्यात कार्यान्वित मुताऱ्या..! “सामुदायिक मूत्रविसर्जन” आंदोलनाची चर्चा जोरात
केज नगरपंचायतीचे दुर्लक्ष; नागरिकांना मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सोडल्याचा आरोप. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याला १० दिवस उलटले; अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना नाही. कुत्र्याने ४० नागरिकांवर हल्ला करत अनेकांना जखमी केले होते
केजमध्ये ‘बुद्धंम शरणम् गच्छामि’ संगीतमय महानाट्याचे भव्य आयोजन फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन – भाई मोहन गुंड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!