• Fri. Jun 5th, 2026

*शिक्षणमंत्र्याचे सन्मान राखून अघोषित महासंघाचे आंदोलन तात्पुरते स्थगित*

Bybaba maske

Oct 25, 2022

शिक्षणमंत्र्याचे सन्मान राखून अघोषित महासंघाचे आंदोलन तात्पुरते स्थगित

मागील अनेक दिवसापासून अघोषित शिक्षक महासंघाने 237 दिवस आंदोलन केले त्यामध्ये प्रामुख्याने प्राध्यापक रंगारी प्राध्यापक जामनिक प्राध्यापक येवले यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला परंतु सुरुवातीला सरकार फारशी गंभीर दखल घेत नसल्यामुळे 10 ऑक्टोंबर पासून शिक्षक महासंघाने महाअक्रोश आंदोलन आझाद मैदानावर सुरू केले आणि संपूर्ण राज्यातून हजारो शिक्षक अघोषित कलंक मिटविण्यासाठी आझाद मैदानावर दाखल झाले हजारोची ही संख्या पाहून सरकारने नमती भूमिका घेतली सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अघोषित महासंघाचे शिस्त मंडळ बोलावले त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अघोषित महासंघासोबत सकारात्मक चर्चा केली आणि नंतर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अघोषित शिक्षक महासंघाला अभिवचन दिले की आम्ही तुमचा प्रश्न 15 नोव्हेंबर पर्यत मार्गी लावतोय.आणि अघोषित मंत्रालय स्तरावरील 3961 शाळा,कॉलेज निधीसह घोषित करून शासन निर्णय काढला जाईल. तुह्मी आंदोलन मागे घ्यावे असे ठोस आश्वासन देण्यात आले.त्यामुळे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शब्दाला मान देत अघोषित शिक्षक महासंघाने 237 दिवस चाललेले ऐतिहासिक महा आक्रोश आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!