• Sun. Apr 19th, 2026

*टेम्पोचालक शौचाला गेला….. अन् चोरांनी मोबाइल पळवला*

Bybaba maske

Oct 25, 2022

 

टेम्पोचालक शौचाला गेला….. अन् चोरांनी मोबाइल पळवला

रोखठोक वार्ताहर 

वाहन उभे करून चालक शौचाला गेला. याचा फायदा घेत चोरट्यांनी टेम्पोच्या केबिनमधील मोबाइल व पाकिटातील रोख रक्कम लंपास केली. ही घटना २३ ऑक्टोबरला तेलगाव (ता. धारुर) येथे घडली.

सादेक करीम शेख (रा. हमीदनगर, उमरगा जि. उस्मानाबाद) हे चालक असून, टेम्पोतून तेलगाव- माजलगाव, आष्टीमार्गे जालन्याला जात होते.

२३ ऑक्टोबरला सकाळी सहा वाजता ते शौचाला जाण्यासाठी त्यांनी टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा केला. ते शौचाहून परत येईपर्यंत त्यांचा ९ हजार रुपयांचा मोबाइल व रोख १५ हजार रुपये असा एकूण २४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी गायब केला. याबाबत सादेक शेख यांनी माजलगाव ग्रामीण ठाण्यात फिर्याद दिली, त्यावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!