• Sun. Apr 19th, 2026

*केजवाशीयांच्या माथी पुन्हा आंधाराच साम्राज्य:पाच MVA चा टान्सफार्मर पुन्हा जळाला.*

Bybaba maske

Oct 25, 2022

केजवाशीयांच्या माथी पुन्हा आंधाराच साम्राज्य:पाच MVA चा टान्सफार्मर पुन्हा जळाला.

     कधी येणार कधी लावणार?

रोखठोक वार्ताहर 

केज येथील सबस्टेशन वितरण होणारा ऐन दिवाळी जळाल्या मुळे पुर्ण शहर आंधारात रहाण्याचे चिन्ह दिसत आहेत.गेल्या तीन महिन्यांपासून 10 MVA चा टान्सफार्मर जळाला होता तो कंपनीची गॅरंटी असल्या कारणाने जळगाव येथे दुरूस्त करण्या साठी पाठवला होता.त्याच वेळेस केज शहराला विज पुरवण्या साठी तात्पुरती वीज ही कुंबेफळ व कानडी येथून शेतीसाठी वापरत असलेली वीज केज शहरा कडे वळवली होती.त्यानंतर जळगाव ला दुरूस्ती साठी पाठवलेला डिपी आल्या नंतर तो लावण्यात आला पण टेस्टिंग करतानाच तो जळाला तो परत दुरूस्ती साठी वापस पाठवला व त्या नंतर पाच एम व्ही चा डीपी मागवून तात्पुरती वीज चालू केली पण आता तो सुद्धा जळाल्याने संपुर्ण केज शहर ऐन दिवाळीत अंधारात आहे.प्रभागा नुसार दोन दोन तासाची लाईट महावितरण देत आहे.पण या वर रात्र कशी भागेल असा सवाल जनता विचारत आहे.जळगावची कंपनी जर नादुरुस्त डीपी पाठवून महावितरण ची दिशाभूल करत असेल तर त्या कंपनीवर कारवाई का होत नाही,त्याचे रीपोर्ट केज अभियंताने उघड करावेत व सर्व जे कोणी वरिष्ठ अधिकारी उंटावरून शेळ्या राखतात त्याची चौकशी करावी अशी जनतेतून मागणी होत आहे.व लाईट पुरवठा किती वेळात सुरळीत होईल हे जनते समोर येऊन महावितरणाने सांगावे.अशी जनतेतून आवाज उठत आहे

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!