• Sat. Jun 20th, 2026

*दोन दशकाच्या अंदोलना नंतर ही नगरपंचायत ने आंदोलन करत्याच्या पाठीत खंजीर खुपसला.*

Bybaba maske

Oct 26, 2022

दोन दशकाच्या अंदोलना नंतर ही नगरपंचायत ने आंदोलन करत्याच्या पाठीत खंजीर खुपसला.

रोखठोक वार्ताहर 

गेल्या वीस वर्षांपासून केज विकास संघर्ष समीती च्या माध्यमातून समाजसेवक हनुमंत भोसले सर उमरी रोड करावा म्हणून संघर्ष करत आहे.आतापर्यंत पंर्यत त्यांनी विक्रमी असे 99 वेळेस निवेदन व विविध प्रकारचे अंदोलने केले आहेत.त्या साठी केज नगरपंचायत ने महाराष्ट्र शासना कडे पाठपुरावा करत होती अखेर मार्च 2022 रोजी महाराष्ट्र शासनाने 98 लक्ष रूपय देऊन पैश्याचा तिढा सोडवला,पण गेल्या सहा सात महिन्यांपासून नगरपंचायत ने आलेली रक्कम दडवून ठेवून एक प्रकारे अंदोलकांची फसवणूक केल्याची भावना आंदोलन कर्त्या मध्ये उपस्थित होत आहे.नेमकी नगरपंचायत प्रशासनाने गेल्या सात महिन्यांपासून कोणतीही निवेदा का काढली नाही व मंजूर झालेली वार्ड क्रमांक आठ व उमरी रोड एक कोटी 33 लाख रूपय का दडवून ठेवले हे एक कोडेच केजच्या जनते साठी आहे.त्याच मुळे ज्या जनविकास परिवर्तन आघाडी कडुन वार्ड क्रमांक सहा मधून उमेदवार असलेल्या उमेदवाराचे पती व सामाजीक कार्यकर्ते ज्यांनी उमरी रोड साठी असंख्य आंदोलन केले त्यांची सुद्धा फसवणूक झाल्याची भावना केज च्या जनतेची झाली असल्याची कुजबुज शहरात ऐकण्यास भेटत आहे.दि 1/11/2022 पंर्यत उमरी रोड च्या कामासंदर्भात कोणतीच कारवाई केली नाही तर केज विकास संघर्ष समिती नगरपंचायत समोर घंटानाद करण्याचा इशारा केज नगरपंचायत ला दिला आहे.

baba maske

Related Post

कचरा जाळून टिपर भस्मसात; केज नगरपंचायतीच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिकाला, भरपाईची मागणी
नगरपंचायतीच्या दुर्लक्षाचा फटका? रस्त्यालगत साचलेल्या कचऱ्याला आग; खाजगी टिप्पर जळून खाक कित्येक दिवस कचरा न उचलल्याचा आरोप; नागरिकांमध्ये संताप, नुकसानभरपाईची मागणी
“आणखी किती बळी घेतल्यावर जागे होणार शासन?”माजलगाव-तेलगाव मृत्यूमार्ग ठरला; रस्त्यावरील भेगेने घेतला आणखी एका महिलेचा जीवनिष्काळजी प्रशासन आणि ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!