• Thu. Aug 6th, 2026

*दारू पितात का ? कृषी मंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल*

Bybaba maske

Oct 27, 2022

 दारू पितात का ? कृषी मंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल 

 

 

राज्यात एकीकडे अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांना फटका बसला असताना राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. अतिवृष्टीच्या पाहणीसाठी आलेल्या सत्तार यांनी थेट जिल्हाधिकारी यांनाच तुम्ही दारू पिता का ? असा सवाल केला अन जिल्हाधिकारी यांनी देखील लाजत लाजत कधी कधी घेतो अस उत्तर दिलं.या दोघांतील संवाद काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी व्हिडीओ सह व्हायरल केल्याने सत्तार अडचणीत आले आहेत.

सचिन सावंत यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओ मध्ये राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हातात चहाचा कप आहे अन ते शेजारी बसलेल्या बीडचे जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा यांना विचारत आहेत की ,तुम्ही दारू पिता का? त्यावर शर्मा यांनी कधी कधी घेतो अस उत्तर दिल्याचे व्हिडीओ मध्ये दिसत आहे.
राज्यातील बहुतांश भागात गेल्या महिनाभरात झालेल्या अतिवृष्टी मुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे.सोयाबीन,कापूस ही पिके डोळ्यासमोर नष्ट झाली,सरकारी मदत अद्याप पोहचलेली नाही.नेते अन कार्यकर्ते येऊन गेले मात्र आद्यप मदतीची घोषणा झालेलीच नाही.
अशात पाहणी दौऱ्यावर आलेले कृषिमंत्री अब्दुल सत्तार त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.त्यांचा अन जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा यांच्यातील संवादाची क्लिप व्हायरल झाली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!