• Sat. Jun 20th, 2026

*अभियंता कल्याण बचुटे यांचा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. अभय ओक यांचे हस्ते सत्कार !*

Bybaba maske

Oct 27, 2022

भिवंडी न्यायालय नवीन इमारतीचे उदघाटन सोहळा

 

अभियंता कल्याण बचुटे यांचा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. अभय ओक यांचे हस्ते सत्कार !

             

 

गौतम बचुटे/केज :- भिवंडी न्यायालयाच्या इमारतीच्या उदघाटन प्रसंगी वीज विभागाचे विद्युत शाखा अभियंता आणि बीड जिल्ह्यातील साळेगांव ता. केजचे सुपुत्र कल्याण बचुटे यांचा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. अभय ओक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दि. ५ ऑक्टोबर २०२२ रोजी भिवंडी येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उदघाटन सोहळा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. अभय ओक सर यांचे शुभहस्ते संपन्न झाले. या उदघाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. माधव जामदार, न्यायमूर्ती मा.शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती मा. गौरी गोडसे, जिल्हा न्यायाधीश अभय मंत्री यांच्यासह केंद्रीय मंत्री ना. कपिल पाटील, राज्याचे कॅबिनेट मंत्री ना रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी यांच्यासह विधिज्ञ उपस्थित होते.
या इमारतीच्या विद्युतिकरणाची संपूर्ण जबाबदारी सांभाळणारे विद्युत शाखा अभियंता कल्याण बचुटे यांचा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. अभय ओक सर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
कल्याण बचुटे हे बीड जिल्ह्यातील साळेगांव ता. केज येथील सुपुत्र आहेत. त्यांच्या या गौरवा बद्दल ग्रामस्थ आणि तालुकावासीयांत आंनद व्यक्त होत असून त्यांच्यावर सोशल मिडियातून अभिनंदनाचा वर्षाव आहे.

baba maske

Related Post

कचरा जाळून टिपर भस्मसात; केज नगरपंचायतीच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिकाला, भरपाईची मागणी
नगरपंचायतीच्या दुर्लक्षाचा फटका? रस्त्यालगत साचलेल्या कचऱ्याला आग; खाजगी टिप्पर जळून खाक कित्येक दिवस कचरा न उचलल्याचा आरोप; नागरिकांमध्ये संताप, नुकसानभरपाईची मागणी
“आणखी किती बळी घेतल्यावर जागे होणार शासन?”माजलगाव-तेलगाव मृत्यूमार्ग ठरला; रस्त्यावरील भेगेने घेतला आणखी एका महिलेचा जीवनिष्काळजी प्रशासन आणि ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!