• Thu. Aug 6th, 2026

*चारा खाल्ला म्हशीने अन् मार खाल्ला शेतमालकाने !*

Bybaba maske

Oct 27, 2022
  • चारा खाल्ला म्हशीने अन् मार खाल्ला शेतमालकाने !

म्हशी चारण्या वरून भावकीत मारहाण !

 

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यात जिवाचिवाडी येथे शेतातील पिकात म्हैस चारु नको असे म्हणतात म्हशीच्या मालकाने शेत मालकाला संगनमत करून कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण झाली आहे. म्हणजे चारा खाल्ला म्हशीने अन् मार खाल्ला शेत मालकाने असा प्रकार घडला आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. २६ रोजी राजेभाऊ दादाराव चौरे यांच्या शेतात शेतात संदीप राजेभाउ चौरे हे त्यांची म्हैस चारीत असल्याचे पाहून राजेभाऊ चौरे हे त्यांना शेतात म्हशी चारू नको असे म्हणाले. त्या वरून दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:०० च्या सुमारास राजेभाऊ चौरे यांच्या घरासमोर संदीप राजेभाउ चौरे, लुकेश राजेभाउ चौरे, राजेभाउ बापुराव चौरे आणि लक्ष्मण बारीकराव चौरे यांनी संगनमत करून राजेभाऊ दादाराव चौरे यास कुऱ्हाडीच्या दांडयाने हातावर, कंबरेवर आणि मांडीवर मुक्कामार दिला. तसेच आम्हाला येथे जनावरे चारु नका; असे का म्हणालास? असे म्हणुन शिवीगाळ केली आणि पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुला आम्ही जीवे मारुन टाकु. अशी धमकी दिली.
या प्रकरणी राजेभाऊ दादाराव चौरे यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात संदीप राजेभाउ चौरे, लुकेश राजेभाउ चौरे, राजेभाउ बापुराव चौरे आणि लक्ष्मण बारीकराव चौरे सर्व रा. जिवचिवाडी ता केज यांच्या विरुद्ध गु. र. नं. ४८८/२०२२ भा. दं. वि. ३२४,३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!