• Sat. Apr 18th, 2026

*ठाकुर रामकृष्ण परमहंस परिवाराच्या वतीने गरीबांची आनंदाची दिवाळी कार्यक्रम संपन्न ; फराळासह महीलांना साड्यांचे वाटप.*

Bybaba maske

Oct 27, 2022

ठाकुर रामकृष्ण परमहंस परिवाराच्या वतीने गरीबांची आनंदाची दिवाळी कार्यक्रम संपन्न ; फराळासह महीलांना साड्यांचे वाटप.

रोखठोक/ प्रतिनिधी 

केज येथील ठाकुर रामकृष्ण परमहंस परिवाराच्या वतीने गोरगरीबांची दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन प.पु.वासुदेवराव खंदारे गुरुजी,सौ.आईसाहेब तसेच युवाह्दय सम्राट ह.भ.प.समाधान महाराज शर्मा यांच्या प्रेरणेमधुन गेल्या पंधरा वर्षापासुन अखंडीत पणे चालु आहे.सर्व समाजातील आबालवृद्ध,महीला,नागरीक या कार्यक्रमाचा लाभ घेत असतात.यावेळी सर्वांनी फराळ व महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच महीलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला .यावेळी काही महीलांच्या डोळ्यात अश्रु दिसुन आले. दरवर्षी चातुर्मासाच्या पवित्र पर्वामध्ये सतत चार महीने सर्व समाजातील लोकांना मोफत अन्नदान कार्यक्रम सतत चालु आहे.जिवभावे शिवसेवा या ब्रिदवाक्याला कायम स्मरणात ठेवून परिवारातील असंख्य साधक निरपेक्ष सेवा कार्यात सक्रीय सहभाग नोंदवत आहेत .नउ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी या काळात रामकृष्ण परमहंस सोहळा हा कार्यक्रम प्रमुख कार्यक्रम असतो.प.पु.वासुदेवराव गुरुजी यांच्या आशिर्वादाने केज वासियांसह महाराष्ट्रातील ईतर ठीकाणी ही गरीबांची दिवाळी कार्यक्रम साजरा केला जातो.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!