• Sun. Apr 19th, 2026

*काळ्या बाजारात जात असलेल्या रेशन धान्याची गाडी पकडली !*

Bybaba maske

Oct 29, 2022

काळ्या बाजारात जात असलेल्या रेशन धान्याची गाडी पकडली!

 

केज तालुक्यातील नांदूरघाट येथे सुरू होता गोरख धंदा

 

 

 

पुरवठा विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी केला पंचनामा : वाहन पोलिसांच्या ताब्यात*

 

गौतम बचुटे/केज :- नांदुरघाट ता केज येथे सेवा सहकारी सोसायटी मार्फत चालवल्या जात असलेल्या स्वस्त धान्य दुकानातील जिवणावश्यक धान्य काळ्या बाजारात घेऊन जाणारी गाडी मध्यरात्री नागरिकांनी पकडून पोलिस आणि पुरवठा विभागाला माहिती दिल्याने प्रशासनाने कारवाई केली आहे.
शनिवार दि. २९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २:०० वा च्या सुमारास नांदुरघाट येथील सेवा सहकारी सोसायतीच्या स्वस्त धान्य दुकानातील धान्य हे सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन शिवाजी जाधव व त्यांच्या सोबचे अन्य तीन ते चार अनोळखी इसम हे सदतील माल हा पशु खाद्याच्या रिकाम्या पोत्यात भरून काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी एका पिकअप क्र. (एम एच-२३/ए यु- ३१९८) मध्ये भरून घेऊन जात होते. दरम्यान रात्री रजनीकांत खाडे हे शेतात जात असताना त्यांना तेथील सर्व हालचाली या संशयास्पद वाटल्या म्हणून त्यांनी तात्काळ ही माहिती नामदेव खाडे यांना मोबाईल वरून देऊन त्यांना बोलावून घेतले. त्या दोघांनी मोबाईल मध्ये त्याचे व्हीडिओ चित्रण केले. त्या नंतर त्यांनी ही माहिती नांदूरघाट दूरस्थ पोलीस चौकीचे पोलिस नाईक अशोक मेसे यांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जात सदर वाहन ताब्यात घेतले आणि ही माहिती पुरवठा विभागाला दिली.
त्या नंतर केज तहसीलच्या पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार सुहास हजारे, मंडळ अधिकारी पठाण आणि तलाठी शिंदे यांनी नांदूरघाट येथे जाऊन पंचनामा केला आहे.
———————————————
चौकट :-
कार्यवाहीचा चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात ! :-
याची माहिती मिळताच अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी जिवनावश्यक वस्तु अधिनियम सन १९५६ नुसार कार्यवाही करण्यासाठी अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवितला आहे.
      — सुहास हजारे
नायब तहसीलदार, पुरवठा विभाग, केज
——————————————–
गोरख धंद्याचा प्रकार उघकीस आणणाऱ्याचा सत्कार व्हायला हवा ! :-* नांदुर घाट येथील रेशनचे धान्य काळ्या बाजारात जात असताना जीवाची पर्वा न करता यंत्रणेला माहिती देऊन त्याचे व्हीडिओ करणाऱ्या रजनीकांत खाडे यांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ नामदेव खाडे या दोघांचा शासनाने सत्कार करायला हवा.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!