गौतम बचुटे/केज :- केज-बीड रोडवर रात्री 9:15 वा. होळ येथे मुंबईहून देवदर्शनासाठी जात असलेली भाविकांची प्रवाशी गगाडी क्र. (एम एच-04/ जी पी-1388) ही डिव्हायडरला धडकून पलटी झाली. यात दहा प्रवाशी किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे स पो नि डॉ. संदीप दहिफळे यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. रस्त्यावरील गाडी बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत सुरू करण्यात येत आहे. या अपघातातील जखमींना गाडी बाहेर काढून त्यांच्यावर प्रथमोचार करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बापू केंद्रे यांनी मदत केली.