• Fri. Jun 5th, 2026

*केज च्या रिमोट कंट्रोल सरकार कडून लेखी अश्वासनाची प्रा हनुमंत भोसले संराची पोस्ट करून विनवणी.*.  

Bybaba maske

Oct 30, 2022

केज च्या रिमोट कंट्रोल सरकार कडून लेखी अश्वासनाची प्रा हनुमंत भोसले संराची पोस्ट करून विनवणी.

आमदार नमिताताई ने त्वरित काम चालु करण्यासाठी लिहीले मुख्यमंत्रयांना पत्र

तीन मार्च पासुन दाबुन ठेवलेल्या पत्रावरील मंजुर निधीची प्रकाशीत केली बातमी ; त्यानंतर हालचालीला आला वेग.

 

रोखठोक वार्ताहर 

केज शहरातील उमरी रस्त्याच्या मंजूर झालेल्या 98 लक्ष रुपयाच्या निधीच्या बातम्या माध्यमातुम प्रकाशित झाल्या होत्या. त्यानंतर केज संघर्ष समितीचे तथा सामाजीक कार्यकर्ते हनुमंत भोसले सर यांच्या सह पदाधिकारी यांनी केजच्या आमदार सौ.नमिताताई मुंदडा तसेच केज नगरपंचायतचे मुख्याधिकारी, केज तहसिलचे तहसिलदार यांना निवेदन सादर केले होते. सदरील निवेदनावर उमरी रस्त्यासाठी सुरुवातीपासून संघर्ष करणाऱ्या केज संघर्ष समितीला 98 लक्ष रुपायांचा निधी आलेला का कळवला नाही ? असे मुख्याधिकारी यांना निवेदनाव्दारे विचारले होते, सदरील रस्त्याची कामे तात्काळ सुरु करावीत अन्यथा एक तारखेला घंटानाद अंदोलन करण्याचा ईशाराही दिला आहे. याची अधिकार्‍यानी कोणतीच दखल घेतली नाही.परंतू प्रा हनुमंत भोसले सरांनी सोशलमिडीया वर पोस्ट करून लेखी अश्वासन द्या मी एक तारखेच घंटानाद आंदोलन वापस घेतो पण नगरपंचायत ने असे कुठलेही पत्र दिल्याचे 30/10/22 सकाळी 11:30 पंर्यत दिल्याचे दिसून येत नााही.सरांच्या भावनिक पत्रा मध्ये नगरपंचायतच्या नगराध्यक्षाला विंनती केलेली नसून जनविकास परिवर्तन आघाडीच्या अध्यक्षाला केली असल्या मुळे एक मागासवर्गीय नगराध्यक्षाला डावल जात असल्याची मागासवर्गीय समाजात चर्चा आहे.
परंतु केज विधानसभेच्या आमदार सौ. नमिताताई मुंदाडा यांनी उमरी रस्त्याची दखल घेऊन थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे त्यामध्ये उमरी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सन 2021- 2022 या आर्थिक वर्षात प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे नागरीकांसाठी अत्यंत महत्वाचा असेलेल्या उमरी रस्त्याच्या दुरुस्तीची प्रशासकीय मंजुरी कायम ठेवुन तातडीने काम करणे अत्यंत आवश्यक आहे असे मुंख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
यामुळे केज शहारातील उमरी रस्त्यासाठी कर्तव्यदक्षपणे केलेल्या पाठपुराव्यामुळे केज विधानसभेच्या आमदार नमिताताई मुंदडा यांच्या नावाची चर्चा केज शहरामध्ये होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!